पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-- - उत्तरमीमांसा. १६५ पंचज्ञानेंद्रिये, तशीच पंचकर्मेंद्रिये आणि अंतःकरणचतुष्टय (मन, बुद्धि, अहंकार व चित्त) यांच्या साहाय्याने विश्व आणि वैश्वानर हे या सर्व स्थूल विषयांचा उपभोग व अनुभव घेत असतात. वन व वनांतील वृक्ष यांत जसा भेद नसतो तसाच ह्या समष्टि व व्यष्टीत भेद नाही. आणि त्या वनाच्या आकाशांत व वृक्षांच्या आकाशांत जसा वस्तुतः भेद नाहीं, तसाच वैश्वानर व विश्व यांत भेद नाहीं. अशा रीतीने पंचीकृत महाभूतांपासून हा स्थूल प्रपंच उत्पन्न झाला आहे. ___ वस्तूवर अवस्तूचा आरोप झाल्यामुळे, (अध्यास किंवा अविद्या याच्यायोगानें ) कारणप्रपंच, सूक्ष्मप्रपंच, आणि स्थूल-पंच असे तीन प्रपंच होतात. ह्या प्रत्येकाची समष्टि आणि व्यष्टि, अशी रूपे आहेत. ह्या तीन देहाच्या किंवा प्रपंचाच्या समिष्ट आणि व्यष्टि यांनी उपहित जो ब्रह्मांश (चैतन्य) त्यास निरनिराळी नांवे आहेत. सुषुप्ति, स्वप्न आणि जाग्रत् अशा त्यांच्या अनुक्रमें तीन अवस्था आहेत. कारणप्रपंचांतील म्हणजे सुषुप्ति अवस्थेतील ब्रह्माशांस ईश्वर व प्राज्ञ म्हणतात. सूक्ष्मप्रपंचांतील ( स्वप्न ) ब्रह्मांशास सूत्रात्मा हिरण्यगर्भ किंवा प्राण आणि तैजस अशी नांवे आहेत; स्थल पंचांतील ( जाग्रदावस्था ) ब्रह्मांशास वैश्वानर व विध अओं म्हणतात. ह्या तीन अवस्थेत असणारे हे तीन ब्रांश होत. या अंशाच्या पलीकडे असणारे व या सर्वांचे आधारभूत असललें जें परम झ त्यासच तुरीय किंवा