पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - - - १६४ प्रस्थानभेद. आकाशाचा भाग+ वायु + अग्नि +" आप + 2- पृथ्वी = १ आकाश झाले. यांत आकाशाचा भाग अधिक आहे म्हणून याला आकाश महाभूत असे म्हणतात. याचप्रमाणे दुसऱ्या भूतांची व्यवस्था असते. अशा रीतीनें पंचमहाभूते (स्थूलभूते) उत्पन्न होऊन त्यांपासून सर्व ब्रह्माण्ड, त्यांतील जारज, अण्डज, उद्भिज्ज, आणि स्वेदज, ही चतुर्विध स्थूल शरीरें व त्यांना उचित असे. अन्नपानादि पदार्थ उत्पन्न झाले आहेत. सूक्ष्म शरीराप्रमाणेच या सर्व स्थूल शरीरांचे समष्टिरूप असते. या समष्टीने उपहित ( व्याप्त ) चैतन्यास वैश्वानर किंवा विराट असें म्हणतात. सर्व नरांचा अभिमानी आणि विराजमान असल्यामुळे या ब्र शास ( जीवास ) हीं नांवें दिली आहेत. समष्टि ही याचे स्थूल शरीर आहे; अन्नाचा विकार यांत होतो, म्हणून त्याला अन्नमयकोश म्हणतात. स्थूल भोगांचा उपभोग या स्थूल शरीरांत मिळतो म्हणन याच्या अवशला जाग्रति असें नाव आहे. थू र शरीराचे व्यष्टि पहि अहे. या व्यष्टीने उपहित चैतन्यास ( श ) विश्व असें म्हण. तात. सूक्ष्म शरीराचा अभिमान न सोडतां स्थूल शरीरांत हा चैतन्यांश ( जीवात्मा) प्रवेश करतो म्हणून त्याला विश्व हे नांव दिले आहे. म्हणजे तो चाहोंकडे आहे असे या नांवाने दर्शविलें आहे. या विश्वाचे व्यष्टि ही स्थूल शरीर होय. हाच अन्नमय कोश आणि याची अवस्था ही जाग्रदावस्था आहे. आपापल्या देवतांनी नियंत्रित असलेली