पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. १६३ प्रपंचाच्या लयाचें हेच स्थान आहे. सूक्ष्म शरीराच्या व्यष्ठीनें व्याप्त जे चैतन्य असते त्यास तैजस म्हणतात. कारण तेजोमय अन्तःकरणाचा उपाधि त्या चैतन्यास असतो. वासना त्याचे ठिकाणी असतात म्हणून त्याच्या अवस्थेस स्वप्नावस्था म्हणतात. व्यष्टि हीच त्याचे शरीर, आणि सर्व स्थूल प्रपंचाचा लय यांत होतो. सूत्रात्मा आणि तैजस हे स्वप्नावथेत मनोवृत्तीसह सूक्ष्म विषयांचा अनुभव घेत असतात. वन आणि वनांतील वृक्ष यामध्ये जसा वस्तुतः भेद नसतो आणि त्यांतील आकाशांतहि जसा भेद नसतो त्याचप्रमाणे या सूक्ष्म शरीरांच्या समाष्टि व व्यष्टि यांत भेद नाही आणि सूत्रात्मा व तेजस ह्यांतहि वस्तुतः भेद नाही. याप्रमाणे सूक्ष्म शरीराची उत्पत्ति आहे. .. पूर्वी सांगितलेली आकाश, वायु, अग्नि, पाणी आणि पृथ्वी, ही पांच सूक्ष्मभूत किंवा तन्मात्रा या प्रत्येकाचें पंचीकरण करून त्यापासून पंचमहाभूते किंवा स्थूलभूतें उत्पन्न होतात. पंचीकरणाची क्रिया येणेप्रमाणे असतेःआकाशादि प्रत्येक सक्ष्म भूताचे बरोबर दोन दोन भाग करावेत. नंतर प्रत्येकाचा. एक अर्धा भाग कायम ठेवून दुसऱ्या अर्ध्या भागाचे पुनः चार चार भाग करावेत. म्हणजे प्रत्येक भूताचे असे भाग होतील. प्रत्येकाचा भाग त्या भूताच्या व्यतिरिक्त असलेल्या चार भूतांच्या अर्ध्या अर्ध्या भागांत मिसळावा याप्रमाणे प्रत्येक भूताचे पंचीकरण होईल. उदाहरणार्थ:--