पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ प्रस्थानभेद. आणि पंचप्राण यांच्या संयोगाने ती एकत्र होऊन त्यापासून प्राणमयकोश होतो. विज्ञानमय कोशांत ज्ञानशक्ति असते. म्हणून तो कर्ता आहे, असे समजावें. मनोमयकोशांत इच्छाशक्ति असते, तो कोश कारण ( साधन ) आहे. प्राणमय कोश रजोगुणाचा असल्यामुळे त्यांत क्रियाशक्ति असते, म्हणून तो कार्यरूप आहे. ह्या तीन कोशांच्या योग्यतेप्रमाणे त्यांचे हे तीन विभाग वर्णिले आहेत. प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, हे तीन कोश मिळून एक जें कार्य होते, त्यास सूक्ष्म शरीर म्हणतात. ___ सर्व सूक्ष्म शरीरांचा समुच्चय करून एक दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले असता, त्यांचें में स्वरूप दिसते त्यास सूक्ष्म शरीराची समष्टि म्हणतात. हें समष्टिरूप पूर्वी सांगितलेल्या झाडीसारखे आहे. हीच सूक्ष्म शरीरें अनेक दृष्टींनी किंवा बुद्धींनी निरनिराळी अशी पाहिली, तर त्याचे व्यष्टिरूप होते. या समष्टीनं व्याप्त जो ब्रह्मांश किंवा चैतन्य त्यास सूत्रात्मा, हिरण्यगर्भ किंवा प्राण असें नांव आहे. दोन्याप्रमाणे तो सर्वांत ओंवलेला असल्यामुळे त्यास सत्रात्मा म्हणतात. ज्ञानवान् आहे म्हणून त्यास हिरण्यगर्भ असें नांव दिले आहे. क्रियावान् असल्यामुळे त्याला प्राण हे नांव मिळाले. या सूत्रात्म्याचे समष्टिरूप (विज्ञानमयादि तीन कोश, हे सूक्ष्म शरीर होय. जाग्रत् स्थितींतील वासना याच्यांत असतात, म्हणून त्याची स्वप्नावस्था असते. स्थूल - - -