पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा जसे असतील तसे ते कार्यात येतात. आकाशादि ही पांच सूक्ष्म भूतें होत. यांनाच तन्मात्रा म्हणतात. यांचे पंचीकरण झालेले नसते. या पांच सूक्ष्म भूतांपासून सूक्ष्म शरीरें आणि स्थूल भूतें उत्पन्न होतात. सूक्ष्म शरीरें हीच सावयव लिंगशरीर होत. लिंगशरीराचे सतरा अवयव आहेत. बुद्धि, व मन, पांच ज्ञानेंद्रिये ( श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि प्राण); पांच कर्मेंद्रिये ( वाणी, हात, पाय, स्नायु आणि उपस्थ) आणि पांच प्राण ( प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान ). याप्रमाणे लिंगशरीराचे हे सतरा अवयव असतात. मन आणि बुद्धि यांत अहंकार आणि चित्त, यांचा अंतर्भाव होतो. बुद्धि आणि मन, यांत आकाशादिकांचे सात्विक अंश एकत्र मिळून असतात. बुद्धि ही अंत:करणाची निश्चयात्मक वृत्ति आहे. मन हे अंतःकरणांतील संकल्प व विकल्प दाखविणारी वृत्ति आहे. आकाशादिकांचे सात्विक अंश ज्ञानेंद्रियांत पृथक् पृथक् आपापल्या इंद्रियांत असतात. बुद्धि व पंचज्ञानेंद्रिये मिळून विज्ञानमय कोश होतो. हा कोशच व्यावहारिक जीव होय. कर्ता, भोक्ता, सुखी, दुःखी, या लोकांत व परलोकी जाणारा, इत्यादि गुण ह्या जीवांत असतात. मन आणि पंचज्ञानेंद्रिये मिळून मनोमय कोश होतो. आकाशादिकांच्या रजोगुणापासून अनुक्रमाने प्रत्येक कर्मेंद्रिय उत्पन्न होते. ह्या आकाशादिकांचे रजोगुणांचे अंश एकत्र मिळून. प्राणपंचक होते. पंचकर्मेंद्रियें