पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० प्रस्थानभेद. योगाने खऱ्या वस्तूचे ठिकाणी भलती वस्तु आहे, असा भास होतो आणि मिथ्याज्ञानाचा उद्भव होतो. ___ या दोन शक्तींनी युक्त अज्ञान ( अविद्या ) हे चैतन्याचा उपाधि आहे. हे उपाधिबद्ध चैतन्य जगताचे निमित्तकारण व उपादान कारण आहे. चैतन्य प्रधान मानले म्हणजे ते निमित्त कारण होते. चैतन्याचे उपाधीला प्राधान्य दिले असतां तेंच उपादान कारण होते. कोळी आपल्या तंतूंचे जाळे करतो. कोळी त्या जाळ्याचा कर्ता असल्यामुळे तो त्याचे निमित्तकारण आहे. परंतु ज्या तंतूंचे जाळें तो बांधीत असतो, ते सर्व तंतू त्या कोळ्याच्या शरीरांतूनच बाहेर पडलेले असतात, अशा दृष्टीने पाहिले असतां, तोच कोळी त्या जाळ्याचे उपादानकारण बनतो. अशीच अज्ञानाने उपहित ब्रह्मांशाची ( ईश्वराची ) स्थिति आहे. अज्ञानोपाधिक चैतन्यापासून ( ईश्वरापासून ) आकाश उत्पन्न झाले. आकाशापासून वायु झाला; वायुपासून अग्नि उत्पन्न झाला; अग्नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. या सर्व पदार्थात जाड्य गुण अधिक असल्यामुळे अविद्येचा जो तमोगुण तो तिच्या विक्षेपशक्तींत प्रधान असला पाहिजे. तमोगुण दुसऱ्या गुणांहून अधिक प्रबळ असतो. म्हणून आकाशादि द्रव्यांत जाड्य गुण अधिक असतो. सत्व, रजस् आणि तमस्, हे गुण कारणांत