पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. - वन व त्यांतील वृक्ष, यांच्यांत जो भेद असतो, तसाच भेद समष्टे व व्यष्टि यांत आहे, असे समजावें. तसेंच वनाचे आकाश व वनांतील, वृक्षांतील आकाश यांच्यांत जो भेद असतो तोच भेद ईश्वर व प्राज्ञ यांत आहे असे समजावें. - स्वयंप्रकाश चिद्रप असा आत्मा असतांहि तो कसा कळेनासा झाला आणि ह्या जडजगताची कशी उत्पत्ति वगैरे झाली, याचे कारण असे आहे, की, ह्या (अविद्या) अज्ञानाचे अंगी दोन मोठ्या शक्ति आहेत. एक आवरणशक्ति आणि दुसरी विक्षेपशक्ति. एक लहानसा ढग सूर्यापुढे आला असतां तो त्या देदीप्यमान सूर्यमंडलाला झांकून टाकून आपल्यास सूर्यदर्शन देत नाही, त्याच प्रमाणे अज्ञानाची ही आवरणशक्ति लोकांच्या बुद्धीवर झांकण घालून आपल्यास प्रत्यगात्मदर्शन करू देत नाही. तिच्यामुळेच दोरी ही खरी दोरी असूनहि ती ओळखतां येत नाही. या आवरणशक्तीच्या योगाने आत्म्यास कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःखादि संसारांतील भावना होऊ लागतात. अज्ञानाची दुसरी जी विक्षेपशक्ति, तिच्या योगाने दोरी ही साप आहे, असें खोटें ज्ञान उद्भवते. ह्याच शक्तीच्या योगानें स्वावृत आत्म्याच्या ठिकाणी आकाशादि प्रपंचाचा उद्भव होतो. ह्या विक्षेपशक्तीने लिंगदेहापासून ब्रह्माण्डापर्यंत सर्व जगत् उत्पन्न केले आहे. आवरणशक्ति वतूंस झांकून टाकते आणि त्या वस्तूंच्या ज्ञानाचा लोप करते. विक्षेपशक्तीच्या