पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. . . अज्ञाने त्यांचा समुच्चय करून त्यांचे एक समष्टिरूप झालेले असते. या समष्टींत विशुद्ध असा सत्वगुण प्राधान्येन असतो. हिमें उपहित ( व्याप्त ) जो ब्रह्माचा भाग (चैतन्य ) त्यास ईश्वर म्हणतात. तो सर्वज्ञ, सर्वेश्वर, सर्वनियंता, अव्यक्त, अंतर्यामी, जगत्कारण इत्यादि गुणांनी युक्त असा आहे. सकल अज्ञानाचा तो अवभासक असल्यामुळे त्यास ईश्वर म्हणतात. ( मुंडक १, १, ९). ही समष्टि ईश्वराचें कारणशरीर आहे; हाच त्याचा आनंदमय कोश; ही त्याची सुषुप्ति अवस्था होय. स्थूल व सूक्ष्म अशा सर्व प्रपंचाचा ह्यांतच लय होतो. झाडींतील प्रत्येक झाडाचा जसा स्वतंत्रपणे विचार करता येतो, त्याचप्रमाणे या प्रत्येक जीवगत अज्ञानाचा स्वतंत्र विचार करता येतो. ह्याला अज्ञानाचें व्यष्टिरूप म्हणतात यांत सत्वगुण प्रधान असतो; परंतु तो मलिन असतो. ह्या व्यष्टिरूपाने उपहित जो चैतन्यभाग ( ब्रह्माचा भाग) त्यास प्राज्ञ म्हणतात. तो एका अज्ञानाचाच अवभासक आहे, अल्पज्ञ अनीश्वर इत्यादि त्याचे गुण आहेत. अहंकारादिकांचं कारण असल्यामुळे ही व्यष्टि त्या प्राज्ञाचे कारणशरीर असते. हाच त्याचा आनन्दमय कोश व हीच त्याची सुषुप्ति अवस्था. सर्व स्थूलसूक्ष्मांचा लय ह्यांतच होतो. प्रलयकाली किंवा सुषुप्ति अवस्थेत ईश्वर व प्राज्ञ यांस आनंदाचा अनुभव होत असतो. याचे कारण असें आहे की, यांवळी अज्ञानवृत्ति अति सूक्ष्म असतात आणि त्या चैतन्याने प्रदीप्त झालेल्या असतात. त्यांच्यामुळे आनन्द उद्भवतो.