पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

... उत्तरमीमांसा. १५७ असतो. अज्ञानाची निवृत्ति होउन अनन्द य हेऊन राहणे, हे ब्रह्मज्ञान प्रात करून घेण्याचे प्रयोजन आहे. ब्रह्मसाक्षात्कार झाला की, संसार संपला. जापयत अविद्या किंवा अध्यास यांचा पगडा बसलेला आहे, तोपयत संसार चालू असणारच. दोरी ही साप नसून ती साप आहे, असा भास होतो तो अविद्येमुळे होतो. एकाद्या वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप करणे म्हणजे अमूक ती खुद्द वस्तु नसून ती दुसरीच वस्तु आहे, असे वाटतें; ( वस्तुन्यवस्त्वारोपः ) ह्याचे कारण अविद्या आहे. अशा ह्या अज्ञानांत सर्व जगतातील व्यवहार चाललेले असतात. ब्रह्म हे एकच वस्तु आहे. तें सच्चिदानन्दानन्त असें आहे. अज्ञानादि सर्व जड पदार्थ असत् आहेत. अविद्या ही सत् आहे, किंवा असत् आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही. ती अनादि आहे. परंतु ज्ञानाने तिचा नाश होतो. सत्व, रज, तम, असे तीन गुण हिच्या अंगी असतात. प्रत्येकास ह्या अज्ञानाची जाणीव असते. तें अज्ञान एकच किंवा अनेक असे दिसते. उंचावर उभे राहून दूर असणाऱ्या झाडीकडे आपण पाहिले असतां, ती झाडी एक वस्तु आहे, असे वाटते. परंतु त्या झाडीत झाडे असतात. त्या प्रत्येक झाडामध्ये अन्तर किंवा आ. काश असते, असे जवळ गेल्यावर दिसून येते. याचप्रमाणे अविद्याजालाकडे समुच्चयदृष्टीने पाहिले असतां, तो अविद्या (अज्ञान) एक आहे असे वाटते. हे त्या अविद्येचे किंवा अज्ञा. नाचें समष्टिरूप समजावे. अनेक जिवांत असणारी जी अनेक