पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. निष्टपरिहार ही करण्यास अलौकिक उपाय ज्या ग्रन्थांत सांगितला आहे तो ग्रन्थ वेद होय. " प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तूपायो न बुध्यते । एनं विदन्ति वेदेनतस्माद्वेदस्य वेदता॥" वेद वस्तुतः एकच आहे. परंतु प्रयोगभेदामुळे आणि यज्ञादिकांच्या निर्वाहाकरितां त्याचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार भेद झाले आहेत. हौत्रप्रयोग ऋग्वेदाने करावा, आध्वर्यव प्रयोग (अध्वयूचे काम) यजुर्वेदाने करावा, आणि औद्ात्र प्रयोग ( गाण्याचे काम ) सामवेदाने करावा. ही तीन कामें यज्ञाचे प्रकार वाढल्यामुळे वाढलीं, आणि त्यासंबंधी मंत्रतंत्राचें अध्ययनहि निराळे करावे लागल्यामुळे वेदाचे हे तीन भेद झाले असावेत. ब्रह्मा आणि यजमान यांच्या कर्तव्यासंबंधी मंत्रांचा आणि विधींचा अन्तर्भाव ह्या तीन वेदांतच होतो. म्हणून अथर्ववेदाची यज्ञास जरूरी नाही. त्यांत केवळ यज्ञप्रकरणींच मंत्र येत नाहीत. शांति, पुष्टि, अभिचार ( जारणमारणादि क्रिया ) इत्यादि कर्माचे प्रतिपादन अथर्ववेदांत केले आहे. वेदाचे दोनच मुख्य भाग आहेत.-मंत्र आणि ब्राह्मण. अनुष्ठान, द्रव्ये, देवता, त्यांचे गुण, क्रिया, स्तुति इत्यादिकांचे वर्णन मंत्रांत केलेले असते. ऋक्, यजु आणि साम असे मंत्रांचे तीन प्रकार आहेत. पद्य किंवा गायित्री वगैरे छन्दोवृत्तांत जा मंत्र सांगितला असतो, त्यास ऋक् म्हणतात. याच ऋचांचा गायनाच्या कामांत विनियोग करून स्या गीतिविशिष्ट झाल्या म्हणजे त्यांस साम म्हणतात.