पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. आणि हे सिद्ध करण्यास दुसरीकडे पाहिले उदाहरणे आणण्याची गरज नाही. या सर्व गाष्ट वरून असे सिद्ध होतें की, ब्रह्माचे प्रमाण शास्त्रे ( वेद ) च आहेत. याप्रमाणे अनेक पूर्वपक्षांचे आचार्यांनी खंडन करून सर्व वेदान्तवाक्ये ब्रह्मात्मज्ञान प्रतिपादन करतात; हेच त्यांचे प्रयोजन आहे; कार्याचा किंवा कर्माचा त्यांत कांहीं संबंध नाही; त्याचे पर्यवसान ब्रह्मज्ञानांतच होतें, असें ह्या सूत्रावरून आचार्यानी सिद्ध करून दाखविले आहे. तसेंच ब्रह्म हे जगताच्या उत्पत्ति, स्थिति व लयांचे कारण आहे, असेंहि स्पष्ट सांगितले आहे. सांख्यमताप्रमाणे ह्या जगताचे कारण प्रधान आहे, आणि तें अनुमेय आहे. कणादादि नैयायिक अणू हे जगाचे उपादानकारण आहेत, असे मानतात. व ईश्वर हा जगताचें समवायी किंवा निमित्त कारण आहे. इत्यादि अनेक मते आहेत; त्यांचे खंडन या दर्शनांत केले आहे. याप्रमाणे परपक्षांचे खंडन करून, स्वतःचे मतांचे मंडनहि या अन्यांत केले आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यास साधनचतुष्टयाची अवश्यकता असते, ही गोष्ट पूर्वी सांगितलीच आहे. साधनचतुष्टय संपादन केल्यावर मनुष्यास हे ज्ञान मिळविण्याचा अधिकार येतो. जीव व ब्रह्म यांत ऐक्य आहे. ते चैतन्य आहेत. हा या शास्त्राचा विषय आहे. हेच प्रमेय होय. वेदान्तवाक्ये ही त्याचे प्रमाण आहेत. ह्या दोहोंमध्ये बोध्यबोधकसंबन्ध