पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. ग्राह्य (उपादेय ) कोणते हे सांगण्याचा असतो. ह्या ठकाणों हय नाही आणि उपाय नाही, तेव्हां तो उपदेश निरथक (ब्रह्मासंबंधी) आहे. यावर सिद्धान्तवादी म्हणतात की, अशा आक्षेपाने उपदेश दोषाह होत नाही. हेयोपादेयरहित ब्रह्मात्मज्ञानापासून सर्व क्लेशांचा नाश होतो आणि यामुळे पुरुषार्थ प्राप्त होतो. हीच मोक्षाची सिद्धि. वेदान्तवाक्यांतच उपासनेच्या संधाने देवतांचे प्रतिपादन असते. ही गोष्ट खरी आहे; परंतु यामुळे आमच्या म्हणण्यास काहीएक विरोध येत नाही. ब्रह्म हे उपासनाविधीचे अंग किंवा शेष आहे, असे म्हटले तर मात्र तें होणे संभवत नाही. कारण ब्रह्मैक्याचे ज्ञान झाले म्हणजे हेयोपादेयांचा विचार रहातच नाही. असे झाले म्हणजे क्रिया, कारक, इत्यादिकांचे द्वैतज्ञान नाहीसे होते. एकत्वाचे विज्ञान झाल्यावर पुनः द्वैताचे विज्ञान होणे संभवत नाही. द्वैताचा अभाव झाल्यावर उपासनाविधि रहात नाही. मग ब्रह्म हे उपासनेचे साधन -कसे होणार ? म्हणून ब्रह्म हे उपासनेचा शेषभाग कधीहि असणार नाही. केवल विधीशी संबंध असणारी अशी पुष्कळ वेदवाक्य असतात. या वाक्यात प्रामाण्य नसते. ह्यांच्याप्रमाणेच ब्रह्मविषयक वेदान्तवाक्ये अप्रमाण आहेत, .. असें प्रत्याख्यान करणे शक्य नाही. कारण ब्रह्मविज्ञानापा। सन फलनिष्पत्ति होत असते. शेवटी में काय सांगावयाचे आहे, तें हैं की, वेदांचे प्रामाण्य अनुमानाने सिद्ध होत नाही,