पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ प्रस्थानभेद. आरंभी हेच एकटा आत्मा होता. “ तदेतद् ब्रह्मापूर्वमपरमनन्तरमबाह्यमात्मा ब्रह्म सर्वानुभूः ( बृहदारण्य. २, ५, १९) तें हें ब्रह्म. हे कारण नाही, कार्य नाही. ह्याच्या आंत बाहेर कांहीं एक नाही. हा आत्मा ब्रह्म सर्व पाहणारा अनुभव घेणारा आहे. " ब्रह्मैवेदममृतं पुरस्तात् "( मुंडक २, २, ११ ) तें अमृत ( अमर ) ब्रह्म पूर्वी व पुढे आहे. इत्यादि इत्यादि. या सर्व वेदान्तवाक्यांचा अर्थ ब्रह्मपर आहे, असे निश्चित झाल्यावर आणि त्यांचा समन्वय समजल्यावर त्या वाक्यांचा अर्थ दुसराच आहे, असे म्हणणे उचित होणार नाही. कारण श्रुतीचा अर्थ टाकून देऊन भलत्याच अर्थाची कल्पना करण्याचा प्रसंग येईल. बरें ही वाक्यं कर्त्याचे स्वरूपाचें प्रतिपादन करतात, असें जर तुम्ही म्हणाल, तर तेंहि युक्त नाही. कारण ज्ञानकाली कोण 'कोणास कसे पाहतो ( तत्केन कं पश्येत् ). असें श्रुतिवाक्य आहे. या वाक्यावरून ज्ञान झाल्यावर कर्ता, क्रिया, साधन व फल, या सर्वांचा नाश होतो, असे सिद्ध होते. ब्रह्म हे सिद्ध (परिनिष्ठित ) वस्तु आहे. तेव्हां दुसन्या सिद्ध वस्तूप्रमाणे ब्रह्माचे ज्ञानहि प्रत्यक्षादि प्रमाणांनी होईल, असे म्हणतां येत नाही. कारण सर्व वस्तूंचा आत्मा (जीवात्मा) हा ब्रह्म आहे (तत्त्वमसि च्छांदोग्य ६-८-७) ही गोष्ट श्रुतिशिवाय दुसऱ्या कोणत्याहि प्रमाणांनी सिद्ध होण्यासारखी नाही. वेदान्तवाक्ये उपदेशात्मक आहेत, असे मानले असता, त्या उपदेशांत अर्थ नाही, कारण उपदेशाचा मुख्य हेतु त्याज्य (हेय) कोणतें, व