पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरामांसा. १५३ वेदवाक्यांना अर्थता आली आहे, असें कोठेहि दिसत नाही. ब्रह्म भूतार्थ वस्तु आहे. भूतार्थ वस्तूत विधीचा संभव नसते. कारण विधि नेहमीं कर्मविषयक असतो. भूतार्थ किंवा सिद्ध वस्तूला कर्माची अवश्यकता नसते. म्हणून विधि आणि ब्रह्म एके ठिकाणी असणे शक्य नाही. विधिशिवाय वेदवाक्यांना अर्थच नाही, असे असल्यामुळे वेदान्तवाक्ये कर्मपरच असली पाहिजेत. त्यांत वैदिककर्म सांगितलेले असेल, किंवा उपासनाकर्म असेल. या सर्व गोष्टींचा विचार केला असतां, वेदादिशास्त्र ब्रह्माचे प्रमाण आहे, असे स्थापित होतच नाही. अशा रीतीनें पूर्वपक्षांचे मत सांगून त्यास उत्तरादाखल “ तत्तु समन्वयात् ” हे चवथें सूत्र बादरायणानी पुढे सांगितले आहे. ___' तत्तु समन्वयात्. ' तत् ( सर्वज्ञ सर्वशक्ति ब्रह्म हेच जगताच्या उत्पत्ति, स्थिति व लय यांचे कारण आहे. ) असें वेदान्तवाक्ये प्रतिपादन करतात. 'तु' ( वेदांत ब्रह्म प्रातपादन नाही, इत्यादि पूर्वपक्षांचे म्हणणे बरोबर नाही.) · समन्वयात् ,' सर्व वेदान्तवाक्यांचा तात्पर्यार्थ हाच आहे. ती सर्व वाक्ये ब्रह्मच जगताचे कारण आहे, असें निश्चितपणे सांगतात ). आचार्यानी या वेदान्तवाक्यांची थोडी उदाहरणे दिली आहेत. ती येणेप्रमाणे:-- “ तदेवसौम्येदमग्र आसीत् ॥ एकमेवाद्वितीयम् ॥" (च्छान्दोग्य. ६.२. १) आरंभी एकटें तेंच होते. एकच, दुसरे काही नाही. “ आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत् ” ( ऐतरेय आ. २. ४. ११) - -