पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. . H - - - प्रस्थानभेद. श्रुति ही ब्रह्माचे प्रमाण आहे, असें कसें म्हणता येईल, अशी पूर्वपक्षाची शंका आहे. कारण सर्व श्रुतिवाक्ये क्रियापर असतात. ज्या आम्नायांत (श्रुतीत ) कर्मासंबन्धाने काहीएक सांगितले नाहीं, ती सर्व वाक्ये अनर्थक आहेत असे समजावें. वेदान्तवाक्यांत कर्म, कर्ता, कर्माची देवता इत्यादि कर्मसंबंधी विषयाविषयी काहीएक प्रतिपादन केलेले नसते. किंवा उपासनादि जे कर्माचे विशिष्ट मार्ग आहेत, त्यांच्याविषयोंहि वेदान्तांत प्रतिपादन केलेले नसते. म्हणून वेदान्तवाक्यं निरथर्क आहेत असे समजावें. शिवाय ब्रह्म हे सिद्धभूतार्थ अशी वस्तू आहे. अशा वस्तू प्रत्यक्षादिप्रमाणांनी समजतात. त्याचे प्रतिपादन श्रुतींनी होणे संभवतच नाही. यदाकदाचित् श्रुतीत ब्रह्मप्रतिपादन असले, तर त्यापासून पुरुषार्थाची प्राप्ति होणार नाही. करण ब्रह्म हे सिद्धवस्तू आहे. तें सिद्ध असल्यामुळे त्यांत ग्राह्य ( उपादय) आणि त्याज्य ( हेय ) असं काही एक नसावयाचेच. हेय व उपादेय नसलें म्हणजे विधि व निषेध हे दोन्ही नसावयाचेच. म्हणजे सुखप्राप्ति व दुःखनिवृत्ति याविषया खटपट होणारच नाही. खटपट झाली नाही तर पुरुषार्थप्राप्ति कशी होणार ? विधि किंवा क्रिमा या संबन्धी सर्व वेदवाक्ये असतात. जेथें क्रिया स्पष्ट सांगितलेली नसते तेथे ती वाक्यं स्तुतिपर किंवा साधनदर्शक अशी असतात. उदाहरणार्थ 'सोऽरोदीत्तस्माद्रस्य रुद्रत्वम्' हे स्तावक वाक्य आहे. 'इषेत्वोर्जेत्वा' ही क्रियांची साधने दाखविणारी वाक्ये आहेत. सारांश विधिसंपर्कावांचून