पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. लक्षणे सांगणारी व ह्यासारखी दुसरी अनेक वेदान्तवाक्ये सांगण्यासारखी आहेत. जगाचे उपादानकारण ब्रह्मच आहे; या अर्थाचे प्रतिपादन पहिल्या अध्यायाच्या चवथ्या पादांतील सातव्या अधिकरणांत पुनः केलेले आहे. " प्रकृतिश्च प्रतिज्ञादृष्टान्तानुपरोधात् " या सूत्रापासून त्या अधिकरणांस आरंभ होतो. श्रुतीतील वाक्यांचा आधार देऊन ब्रह्म हे जगाचे उपादानकारण आहे असे सिद्ध केले आहे. या जगाचे उपादान व निमित्त कारण ब्रह्म आहे असे प्रतिपादन करण्याचे वेळी ब्रह्म सर्वज्ञ आहे, असे सांगितले आहे. हेच सर्वज्ञत्व दृढ करून सांगण्याकरतां "शास्त्रयाोनत्वात् " हे तिसरें सूत्र बादरायणानी प्रणीत केले आहे. ____“ शास्त्रयोनित्वात् " शास्त्राची योनि म्हणजे कारण ( ब्रह्म आहे ), म्हणून ब्रह्म सर्वज्ञ सर्वशक्ति असे आहे. येथे शास्त्रशब्दाचा व्यापक अर्थ आहे. ऋग्वेदादि चार वेद, वेदांगें, उपांगें, उपवेद, म्हणजे सर्व वेद, स्मति, शास्त्रे, पुराणे इतिहास, आख्याने, किंबहुना १४ किंवा १. विद्या ज्या स्मृतीत सांगितल्या आहेत त्या सर्व विद्यांचा अन्तभीव ' शास्त्र' शब्दांत होतो. हे महत् शास्त्र सर्वज्ञ आहे. दिव्याप्रमाणे ते सर्व अर्थावर प्रकाश पाडते. अशा ह्या शास्त्राचे कारण ब्रह्म होय. सर्वज्ञाचे गुण असणाऱ्या या वेदादि शास्त्राचा कर्ताहि सर्वज्ञच असला पाहिजे. सर्वज्ञावांवून दुसऱ्याच्या हातून असले शास्त्र निर्माण होणे अशक्यच आहे. या जगांत सामान्यतः आपल्यास असे दिसून येते