पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. असतो. धर्म, किंवा कर्म, यासारख्या साध्य किंवा कार्य गोष्टीसंबंधानें पुरुषबुद्धीच्या साहाय्याने विकल्प, अपवाद वगैरे उत्पन्न होणे संभवनीय आहे. भूतवस्तुसंबंधानें असल्या विकल्पना होणे शक्य नाही. ब्रह्मभूत वस्तु आहे. तिचे ( भूत वस्तूचे ) यथार्थ ज्ञान पुरुषबुद्धीवर अवलंबून नसते. तें वस्तुतन्त्र असते. त्याचे प्रामाण्यहि वस्तुतंत्रच असते. ब्रह्मज्ञानाचीहि अशीच गोष्ट आहे. आतां ब्रह्म जर भूत वस्तु आहे, तर इतर भूतवस्तुप्रमाणे, तेंहि प्रमाणान्तरांनी समजले जाईल. याकरितां ब्रह्मज्ञान होण्यास श्रुतिवाक्यांची विचारणा करणे व्यर्थ आहे, अशी शंका कोणी घेतील. ही शंका बरोबर नाही. कारण ब्रह्म हे इंद्रियगोचर नाही. आणि तें इंद्रियगोचर नसल्यामुळे त्याचा ( जगताशी ) संबन्ध दिसून येत नाही. ब्रह्म इंद्रियांकडून जाणतां येत असते, तर त्याचा ह्या जगद्रुपी कार्याशी असलेला संबन्ध दिसून आला असता. जगत् हे इंद्रियग्राह्य आहे; तेवढें तें इंद्रियांस दिसते. पण तें ब्रह्माशी संबद्ध आहे, किंवा दुसन्या कोणत्यातरी एकाद्या वस्तूशी संबद्ध आहे, याचा निश्चय करणे शक्यच नाही. म्हणून ब्रह्म प्रमाणान्तरानें ज्ञेय नाही, आणि " जन्माद्यस्य यतः " या सूत्रांत ब्रह्माविषयींचे अनुमानाचा उपन्यास नाही. तैत्तिरीय उपनिपदांतील भृगुवल्लीत जें ब्रह्माचे लक्षण सांगितले आहे, तेंच लक्षण या सूत्राचे द्वारा व्यासानी सांगितले आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, स्वभाव, सर्वज्ञ, स्वरूप, कारण, इत्यादि ब्रह्माची