पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. जीवाहून व्यतिरिक्त असा ईश्वर आहे. तो जगताचें कारण आहे. त्याचे अस्तित्व अनुमानप्रमाणाने सिद्ध होते, असें ईश्वरकारणी लोकांचे मत आहे. (ईश्वरकारणी हे वैशेषिकांचे नांव आहे.) ह्या मता अनुसरून ' जन्माद्यस्य यतः ' या सूत्रांत व्यासानी त्याच अनुमानाचा उपन्यास केला आहे. तेंच अनुमान प्रतिपादिले आहे, असे म्हणता येणार नाही. कारण सूत्रांत वेदान्तवाक्येंच प्रथित केली असतात. त्या वेदान्तवाक्यांचे अर्थाचा विचार करून निश्चय झाला म्हणजे त्यापासून ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मसाक्षास्कार होतो. तो साक्षात्कार केवळ अनुमानाने होत नाहीं. 'जन्मादिसारखीं ब्रह्म हे कारण आहे, असें दाखविणारी वेदवाक्ये असल्यावर त्या वाक्यांचा अर्थ दृढ करण्यास अनुमानादिप्रमाणे साहाय्य होत असली तर ती घेण्यास हरकत नाही. मात्र ही अनुमानादिप्रमाणे वेदवाक्याच्या अर्थाशी संगत असली पाहिजेत. त्यामध्ये विरोध असतां कामा नये. अशा कामी श्रुतीनेच तर्काचे व पुरुषबुद्धीचे साहाय्य घेतलेलें असतें. ' श्रोतब्यो मन्तव्यः , “ आचार्यवान्पुरुषो वेद " इत्यादि श्रुतीवरून पुरुषबुद्धीचे साहाय्य ध्यावे हेच सिद्ध होते. ब्रः जिज्ञासेला केवळ अनुमान किंवा केवळ श्रुतिवाक्येंच पुरींशी होत नाहीत. ब्रह्मज्ञानाला श्रुतिवाक्ये आणि अनुभवादि यांची यथासंभव अवश्यकता असते. तो त्याची प्रमाणे होतात. ब्रह्म हे सिद्धभूत अशी वस्तु आहे. ब्रह्मविज्ञानाचा शेवट अनुभव किंवा साक्षात्कार, यांत हो ।