पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. . उत्तरमीमांसा. की, हे भावविकार वस्तला स्थिति प्राप्त झाल्यावर त्यामध्ये होत असतात. त्यांला जगांतील अनेक वस्तू कारणभूत झालेल्या असतात. मूळ कारणापासून ते भावविकार उत्पन्न झाले नाहीत, अशी शंका येऊ नये, ह्मणून ब्रह्मापासूनच जगाची उत्पत्ति, त्याच्यामुळेच जगाची स्थिति आणि शेवटी ब्रह्मांत त्याचा लय असे प्रतिपादन केले आहे. .." हे जगत् नामरूपानें व्याकृत झालेले आहे. यांत अनेक कर्ने ब भोक्ते जगाशी संयुक्त आहेत. नियत अशा कालादिक निमित्तादिकांचा हे जगत् आश्रय आहे. याच्या रच नेविषयी कल्पना सुद्धा करवत नाही. ह्या जगताचे सर्वज्ञ, सर्वशक्ति ब्रह्माव्यतिरिक्त दुसरें एकादें कारण असणे संभवत नाही. सांख्यांच्या अचेतन प्रधानापासून जग निर्माण झाले आहे असे दिसत नाही. नैयायिकांच्या परमाणूपासून असलें जगत् उत्पन्न होणे शक्य नाही. बौद्धांच्या शून्यापासून जगताची उत्पत्ति वगैरे व्यवहार चालणार नाहीत. संसारी जीवात्म्यापासून ही संसृति होत नाही. स्वभावतःच हे जगत् निर्माण होऊन चालत आहे, असे म्हणता येणार नाही. कारण कोणत्याहि कार्यास विशिष्ट देश, विशिष्ट काल, व विशिष्ट निमित्ताची अवश्यकता असते. नित्य शुर. बुद्र, मुक्त, सर्वत्र, सर्वशक्ति, इत्यादि प्रकाराने वर्णन केले पर ब्रह्म हेच या जगताच्या सर्व सृष्टयादिकांचे कारण आह. 'सत्यंज्ञानमनन्तं ब्रह्म,' असें ब्रह्माचे स्वरूपलक्षण सांगितले आहे.