पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हेत. ह्या मतांशिवाय आणखी दुसरी प्रसिद्ध अशी सहा मते आहेत. त्यांस पूर्वीचे विद्वान नास्तिक मतें असें मानतात. बृहस्पति, बुद्ध व जिन हे तीन मोठे तत्ववेत्ते विचारी पुरुष पूर्वी होऊन गेले. त्यांनी आपली मतें स्थापित करून, त्या मतांचे प्राबल्यहि पुष्कळ दिवस हिंदुस्थानांत चालू होते, ही गोष्ट निर्विवाद आहे. बौद्ध व जैनधर्मी लोकांची संख्या आज मितीला पुष्कळ आहे. बौद्धमताच्या ४ शाखा झाल्या, आणि त्याची चार प्रस्थाने झाली. जैनांच्या दोन शाखा आहेत. परंतु त्यांचे प्रस्थान एकच मानिलें आहे. आणि चार्वाक मताचे (बृहस्पतीचे ) एक प्रस्थान, ही सर्व मिळून सहा प्रस्थाने होतात. चार्वाक पंथी लोक सध्या कोठे दिसत नाहीत. तथापि तत्पन्थीय आम्ही आहोत असें न म्हणतां त्या पंथाप्रमाणे वागणाऱ्या लोकांची संख्या समाजांत वाढण्याची भीति वाढू लागली आहे. या सर्व मतांचें दिग्दर्शन यथाक्रम पुढे केलें आहे. वेद म्हणजे काय ? त्याचें सामान्य लक्षण कसे करावें ? असे विचारले असता, त्याचे उत्तर थोडक्या शब्दांनी देतां यईल. धर्म किंवा कर्म आणि ब्रह्म ह्यांचे प्रतिपादन करणारा, ईश्वरप्रणीत, मनुष्याने न केलेला, विश्वसनीय प्रमाणा.. स्मक जो ग्रन्थ, त्याला वेद म्हणतात. इष्टप्राप्ति आणि अ.