पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. . इमानि भूतानि जायन्ते, यतो जातानि जीवन्ति, यत्प्रयन्त्यभिसंविशन्तीति.” असे सांगितले आहे. त्याच प्रमाणे व्यवहारांत आपल्यास असे स्पष्ट दिसून येते की, प्रत्येक वस्तूची उत्पत्ति झाल्यावर तिच्या अंगी विशेष धर्म व सत्ता येतात आणि मग त्या वस्तूची स्थिति व संहार होतात. हे जगत् नाम व रूप यांनी व्याकृत झालेले आहे. म्हणजे ह्यांतील सर्व वस्तुमात्राचे व्यवहारिक ज्ञान आपल्यास त्यांच्या नामरूपाने होते. ह्या जगांत अनेक कर्ते व भोक्ते आहेत. यांनीं तें संयुक्त असते. नियमित काली, स्थळी, व निमित्तानें, क्रिया व क्रियाफळे उत्पन्न होत असतात, त्या सर्वांचा आश्रय हे जगत् आहे. या जगाच्या रचनेची कल्पना आपल्या मनाला सुद्धा करता येत नाही. अशा या जगताची उत्पत्ति, स्थिति आणि लय, यांचे कारण सर्वज्ञ व सर्वशक्ति में ब्रह्म तें आहे. असा या सूत्राचा सारांश आहे. हे ब्रह्माचें तटस्थ लक्षण आहे. जन्मादि या पदाचा उत्पत्ति, स्थिति व लय असाच अर्थ कां करावा ? यास्कांनी सांगितलेल्या सहा भावविकारांचा बोध त्या पदापासून कां होणार नाही? अशी शंका कोणी घेतली, तर त्यास उत्तर असें आहे की, उत्पत्ति, स्थिति व लय असा अर्थ करण्यास श्रुतीचा साक्षात् आधार आहे. यास्काच्या भावविकारांस श्रुतीचा आधार आहे, ही गोष्ट खरी, परंतु साक्षात् आधार टाकून परंपरेने येणाऱ्या आधारावर अवलंबून राहाणे योग्य नाही. दुसरे कारण असे आहे