पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. युक्तीच्या आणि श्रुतिवाक्यांच्या आभासावरच भिरत आहे. अशा परस्परविरुद्ध मतांचा पूर्ण विचार न करतां जर एकाद्या मताचे अवलंबन केले तर निश्रेयसफल प्राप्त न होतां अपाय मात्र होण्याचा संभव आहे. म्हणून ब्रह्मजिज्ञासा असावी. असे सांगून सर्व वंदांतवाक्यांच्या मीमांसेस आरंभ ह्या उत्तरमीमांसेंन केला आहे. मोक्षाप्ति हे याचे प्रयोजन आहे. वेदांतवाक्यास प्रतिकूल नसणारा तर्क व युक्तिवाद याचेंहि साहाय्य या मीमांसेंत घेतले आहे. श्रुतिवाक्ये आणि त्यांस अनुकूल तर्क यांच्या आधारावर सर्व विचार केला आहे. ब्रह्मज्ञान संपादन करावे असें पहिल्या सूत्रांत सांगितले आहे. आतां ब्रह्म म्हणजे काय ? त्याचे लक्षण कोणते ? हे दुसऱ्या सूत्रांत सांगतात. “जन्माद्यस्य यतः” हे दुसरें सूत्र व दुसरे अधिकरण होय. जन्मादि (उत्पत्ति, स्थिति आणि लय ), अय (ह्याचें-जगताचें), यतः (ज्यापासून ), तें ब्रह्म होय, असं ब्रह्मांचे लक्षण दिले आहे. (ह्या सूत्राबरोबर चवथ्या प.दांतील सातवे अधिकरणाचा विचार करावा. (सूत्रे २३-२७) त्या अधिकरणांत ब्रह्म हे जगाचें उपादान कारण आहे असे सिद्ध केले आहे ). उत्पत्ति, थिति आणि लय, असाच जगतांतलि सर्व वरतूंचा अनुक्रम आहे. ह्याला श्रुतीचा आणि वस्तुवृत्तीचा (वस्तुस्थितीचा) आधार आहे. भृगुवल्लीत " यतो वा