पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- प्रस्थानभेद, आहे. आणि आत्मा सर्वांस माहीत आहे, तेव्हां ब्रह्महि सर्वांस माहीत आहेच; असे झाले, तर मग ब्रह्माविषयीं जिज्ञासा करण्याची काय अवश्यकता उरली आहे ? अशी कोणी शंका घेतली तर त्यावर उत्तर असें आहे की, आत्मा शब्दाचे अनेक मतांत अनेक अर्थ केले आहेत. यासाठी आत्म्याचा खरा अर्थ कोणता हे निश्चित करणे अवश्य आहे. चेतनायुक्त देह हाच आत्मा असें प्राकृत लोक समजतात. चावाकानुयायांचे ( लोकायितांचें) हेच मत आहे. सचेतन इंद्रियें हाच आत्मा असे काही लोक मानतात. काही लोक मनालाच आत्मा म्हणतात. इंद्रिये किंवा मन यांना आत्मा म्हणणारे लोक चार्वाक मताच्या शाखांपैकींच आहेत. बौद्ध मतांतील योगाचार ( विज्ञानवादी) क्षणिक जें विज्ञान त्यालाच आत्मा समजतात. बौद्धमतांतील माध्यमिक लोक शून्य हेच आत्मा असे म्हणतात. आत्मा देहाहून भिन्न आहे, तो संसारी ( जीव ) कर्ता व भोक्ता आहे, असें नैयायिक आणि पूर्वममिासांकार यांचे मत आहे. सांख्य मताप्रमाणे आत्मा हा शुद्ध भोक्ता आहे. जीवाहून व्यतिरिक्त, ईश्वर, सर्वज्ञ, सर्वशक्ति असा आत्मा आहे, असे योगशास्त्राचे मत आहे. भोक्ता जो जीवात्मा तोच तो परमात्मा असें वेदान्त्यांचे मत आहे. याप्रमाणे आत्म्याविषयी विप्रतिपन्न ( परस्परविरोधी ) अशी अनेक मतें आहेत. काही लोक युक्तिवादाने आपले मत स्थापित करण्यास पहातात. काही वाक्यांचा आधार घेतात. काहींची