पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा समजू नये. ' ब्रह्मणो जिज्ञासा ' ही कणि षष्ठी आहे, शेषे षष्ठी नाही. ब्रह्माचे ज्ञान होणे ही प्रधान गोष्ट आहे. ब्रह्मज्ञान होण्याकरितां, ब्रह्माच्या आश्रयाने असणाऱ्या दुसन्या वस्तूंचे ज्ञान होणें अवश्य असेल; परंतु ब्रह्मज्ञान करून घ्यावयाचे, असे म्हटलें म्हणजे त्या ज्ञानाला अवश्य असणारे ब्रह्माश्रित वस्तूंचे ज्ञान करून घेणे अवश्य आहे, ही गोष्ट प्रामुख्याने सांगावयास नको. ब्रह्मज्ञान करून ध्यावयाचे आहे, असे म्हटले म्हणजे झाले. त्यांत आश्रित वस्तंच्या ज्ञानाचा अन्तर्भाव होतो. - ब्रह्म प्रसिद्ध आहे कां अप्रसिद्ध आहे ? प्रसिद्ध असेल तर त्याविषयीं जिज्ञासा असण्याची जरूरी नाही. ब्रह्म अप्रसिद्ध असेल, तर त्याविषयी जिज्ञासा असण्यांत अर्थ नाहीं ! असे काही लोक म्हणतात. यावर आचार्यांचे उत्तर असें आहे:---ब्रह्म प्रसिद्ध आहे. तें नित्य शुद्ध, बुद्ध, मुक्त, सर्वज्ञ, सर्वशक्तिमत् असें आहे. बृह ( वृद्धि पावणे) या धातूपासून तो शब्द झाला आहे अशी व्युत्पत्ति आहे. या व्युत्पत्तीवरून ब्रह्माचें वर सांगितलेले स्वरूप दिसून येते. शिवाय सर्वांचा जो आत्मा तोच ब्रह्म होय. ब्रह्म आणि आत्मा हे एकच. यावरून ब्रह्माचे अस्तित्वाची प्रसिद्धि आहे. आत्मा आहे अशी प्रत्येकाची प्रतीति असते. आत्मा नाही असे कोणी म्हणाला तर, मीच नाही असें त्यास म्हणावे लागेल. ' मी नाही' अशी त्यास प्रतीति होईल. आत्मा हेच ब्रह्म होय. आतां आत्मा हेच ब्रह्म