पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. जगांत किंवा स्वर्गात मिळणाऱ्या कर्मफलाच्या उपभोगा. विषयी मनाची विरक्ति. (३) शम, दम, उपरति, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा हे सहा गुण अंगी असले पाहिजेत. आणि ४ मुमुक्षुत्व-मोक्ष मिळविण्याची इच्छा. हे साधनचतुष्टय संपादन केल्यानंतर ब्रह्मज्ञान मिळविण्यास आरंभ करावा. अग्नहोत्रादि कर्मे श्रेयः ( सुख ) संपादन करून देणारी असतात. परंतु हे फळ कायमचे नसते. तें अनित्य असते, ह्या कर्मफलांचा क्षय होतो. एकंदरीत कर्माचे फळ अनित्य आहे. मग त्या फलाचा उपभोग येथे मिळावयाचा असो, किंवा स्वर्गात मिळावयाचा असो, असें वेदांत सांगितले आहे. हे फल अनित्य असल्यामुळे, त्याची अपेक्षा करणे योग्य नाही. म्हणून वेदांत सांगितलेले नित्य व उत्तम फल जी मोक्ष तो माप्त करून घेण्याची इच्छा करावी. है परमफल ब्रह्मज्ञानानें प्राप्त होते. 'ब्रह्मविदाप्नोति परं ' असें तैत्तिरीय उपनिषदांत सांगितले आहे. म्हणून ब्रह्मज्ञान मिळविण्याची खटपट करावी. सूत्रांतील 'अतः' शब्दावरून ह्या कारणाचा बोध होतो. म्हणून अवश्य साधनें संपादन करून मोक्षासाठी ब्रह्मज्ञान करून घ्यावें. ब्रह्मविषयक जी जिज्ञासा, ती ब्रह्मजिज्ञासा. 'ब्रह्म' शब्दाचा अर्थ पुढल्या सूत्रांत सांगितला आहे, म्हणून त्या शब्दाचे अर्थ ब्राह्मण, स्तोत्र इत्यादि वाचक आहेत, असे