पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. तर त्याला माती लागते आणि कुंभाराचीहि जरूरी असते. माती ही घटाचे उपादानकारण, आणि कुलाल (कुंभार) हा त्याचे निमित्तकारण होय. सर्व जगताचें ब्रह्म हेच उपादानकारण व निमित्तकारण आहे. या ब्रह्माचा विचार आरण्यकें व उपनिषद (वेदान्त ) ह्यांत केला आहे. त्याचीच मीमांसा बादरायणांच्या उत्तरमीमांसा किंवा वेदान्तमीमांसा या ग्रन्थांत केलेली आहे. ____ अथातो ब्रह्मजिज्ञासा ' नंतर म्हणून ब्रह्म जाणण्याची इच्छा ( करावी ), किंवा ब्रह्माचा विचार करावा. हैं या मीमांसेचे पहिले सूत्र व अधिकरण आहे. 'अथ ' शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्याचा आनन्तर्य ( नंतर ) हा अर्थ येथे आहे. ब्रह्मजिज्ञासेला स्वाध्याय पूर्वी झालाच पाहिजे. परंतु त्याला कर्माचे किंवा धर्माचे प्रत्यक्ष ज्ञान असणे अवश्य नाही. कारण त्या ज्ञानाशिवाय ब्रह्मविचार करतां येतो. ब्रह्मासारख्या गहन विषयाचा विचार करण्यास मनाची तयारी अगोदर झालेली पाहिजे. अशी तयारी झाली नाही, तर ब्रह्मज्ञान होणे कठीण आहे. ह्या ब्रह्मज्ञानाची चार साधने सांगितली आहेत, ती प्राप्त झाल्यावर मग ब्रह्म जाणण्यास मनुष्य पात्र होतो. ही साधनें संपादन केल्यावर मग ब्रह्म जाणण्याची इच्छा करावी असा ' अथ' शब्दाचा अर्थ आहे. हे साधनचतुष्टय येणेप्रमाणे:-(१) नित्यानित्यवस्तुविवेक; नित्य वस्तु कोणती, अनित्य कोणती, याविषयी विचार करून निश्चय झालेला पाहिजे. ( २ ) ह्या