पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० प्रस्थानभेद. व भोक्तृत्व आली आहेत. हाच संसार होय. एक वस्तू अमुक एक नसूनहि ती तीच आहे अशी बुद्धि (समजूत) होणे, हे अध्यासाचे लक्षण असल्यामुळे आणि सर्वत्र अध्यास असल्या कारणानें, वास्तविक शुद्ध आत्मस्वरूपाचें ज्ञान होणे शक्य नाही. अध्यासापासून होणारे ज्ञान मिथ्या असावयाचेंच. म्हणून ह्या अनर्थ करणाऱ्या अध्यासाचे (अविद्येचें) निरसन करण्यासाठी आणि आत्मैकत्वविद्या प्राप्त व्हावी याकरितां सर्व वेदान्तांच्या अभ्यासास आरंभ करतात. वेदान्तवाक्यांचा हाच अर्थ आहे असें शारीरमीमांसेंत सांगितले आहे, आणि तो अर्थ शंकराचार्यानी आपल्या भाष्यांत प्रगट करून दाखविला आहे. ___ ब्रह्म हे सर्व जगताचे उपादानकारण आहे आणि त्याचे निमित्त कारणहि ब्रह्मच आहे. जगत् ब्रह्मापासून झाले आहे, आणि त्या जगताचा कर्ता ब्रह्मच आहे. 'सत्यं ज्ञानमनन्तम् ब्रह्म असें' ब्रह्माचे स्वरूपलक्षण आहे. ते सत्य आहे, ज्ञानरूप आहे. त्याला अन्त नाही. जगताची उत्पत्ति, स्थिति, आणि लय ब्रह्मापासून होतात. लयानन्तर सर्व वस्तू ब्रह्मांत प्रवेश करून त्यांतच रहातात. कोणतीहि एकादी वस्तु निर्माण करावयाची असली तर तिला द्रव्याची अपेक्षा असते. म्हणजे ज्या द्रव्याची ती करावयाची असते तें द्रव्य तयार असणे अवश्य आहे. तसेच त्या द्रव्याला विशिष्ट वस्तूचा आकार, रूप वगैरे देणारा कारागीरहि हवा असतो. घट तयार करावयाचा असला