पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमामांसा. कर्तृत्व व भोक्तृत्व ह्या वृत्ति कर्म करणाऱ्यांत जागृत पाहिजत. त्यांचा अध्यास आत्म्यावर असला पाहिजे; नाही तर कर्म कां करावें. हेच समजणार नाही. आत्मा जर असल्या धमानीं संबद्ध नसेल म्हणजे अविद्यावान् नसेल तर त्याचा कर्माशी विरोधच असावयाचा. वेदान्तवेद्य शुद्ध अशा प्रकारच्या आत्म्याचें ज्ञान झाले की मग कशाचीच जरूरी रहात नाहीं. मोक्षप्रतिपादक शास्त्रांच्याविषयी असेंच म्हणता येईल. एतावता सर्व लौकिक व शास्त्रीय व्यवहार या अध्यासावर अवलंबून आहेत. हा अध्यास नसता तर संसार चाललाच नसता. पुरुषाची परिस्थिति, त्याचे शरीर, त्याची इंद्रिये, त्याच्या अंतःकरणवृत्ति, या सर्वांच्या धर्माचा पगडा त्यावर नेहमी बसलेला असतो. त्याच्यावर त्याचा अध्यास असतो. तो अविद्येने ग्रस्त झालेला आहे. मुले बाळे वगैरेची बरी वाईट स्थिति असली तर त्यास बरें वाईट वाटत असते. देहास रोग झाला असतां मी रोगी आहे, असे तो म्हणतो. इंद्रिय विगलित झाले तर मीच विगलित आहे, असे त्यास भासते. अन्तःकरणांत राग लोभ किंवा आनंदादि विकार उत्पन्न झाले म्हणजे, मलाच राग, लोभ किंवा आनंद झाला अशी त्या पुरुषाची प्रतीति असते. याप्रमाणे आत्मा आणि अनात्मा यांचा एकमेकांवर अध्यास सतत चालू आहे. आपणांस हा अध्यास केव्हां सुरू झाला व केव्हां तो नाहींसा होईल हे कळत नाही. तो अनादि व अनन्त आहे. त्याच्यामुळेच मनुष्याला अथवा वस्तुमात्रांस कर्तृत्व