पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ प्रस्थानभेद. असल्यामुळे पुरुषव्यवहारहि विवेकरहित असतात, असा निश्चय होतो. पुरुषांचे प्रत्यक्षादि प्रमाणव्यवहार अविद्यामूलक असतील, परंतु शास्त्रीय व्यवहारहि अविद्यामूलक आहेत, असे म्हणणे ठीक होणार नाही. कारण कर्म करणारा व त्याचे फल भोगणारा हा देहादिकांहून निराळा आहे. अशी समजूत असल्याशिवाय स्वपिभोगासारखें फळ मिळविण्याची इच्छा कोणी करणार नाही. इहलोकींच देह मरणानंतर नाहीसा झाल्यावर स्वर्गोपभोग घेणारा असा देहाच्या व्यतिरिक्त कोणी तरी असला पाहिजे. तो आत्मा होय. देहापासून तो निराळा आहे. अशी समजूत असते. म्हणूनच मनुष्य शास्त्रविहित कर्म करतो. ह्यावरून असे दिसून येईल की आत्म्यावर अध्यास नसतो; व शास्त्रीयक, अविद्यामूलक नसतात. हा पूर्वपक्ष झाला. ह्या शंकेवर समर्पक उत्तर देतात तें असें:-देहाहून आत्मा निराळा आहे ही बुद्धि कर्म करणारांस असते ही गोष्ट खरी आहे. परंतु हा आत्मा निर्लेप असतो असें मात्र नाही. क्षुधा, तृष्णा, फलोपभोगाची इच्छा, वर्णाश्रमाचा अभिमान वगैरे गोष्टींचा त्या आत्म्याला लेप असतो; यांचा त्यावर अध्यास असतो. वेदविहित कर्म करण्याकरितां वेदान्तवेद्य जो शुद्धबुद्ध निसंग आत्मा, त्याची अपेक्षा नसते. कारण वेदान्तवेद्य आत्मा हा शास्त्रीयकांच्या उपयोगी नाही व तशा आत्मज्ञानाने कर्मास विरोध मात्र येईल. कर्म करावयाचे, तें फलोपभोगाच्या हेतूने करावयाचे असते. म्हणून