पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा १३७ (ज्ञान मिळविणारा) असला तरच प्रमाणांचा उपयोग होणार, नाहींतर प्रमाणे प्रवृत्त होणारच नाहीत. प्रत्यक्षादि प्रमा. णांचा व्यवहार किंवा प्रवृत्ति इंद्रियांवाचून होणे अशक्य आहे. इंद्रियांस एकादें अधिष्ठान असल्यावांचून इंद्रियांचा व्यापार कधीहि संभवणार नाही. ज्या देहावर आत्मभावाचा अध्यास झालेला नाही, अशा देहाच्या साहाय्याने कोणीहि व्यापार करणारा नाही. त्याचा व्यापार चालू असणे हे अशक्यच आहे. वर सांगितलेल्या सर्व गोष्टी नसल्या तर असंग असा असणाया आत्म्याला प्रमातृत्व येणार नाही, आणि ह्यामुळे प्रमाणांची प्रवृत्ति व्हावयाची नाही. म्हणून प्रत्यक्षादिप्रमाणे आणि शास्त्रे अविद्यामूलक आहेत. अध्यासाशिवाय त्यांचा व्यापार चालत नाही. पशूसारखेच पुरुषांचे प्रत्यक्षादि व्यवहार चालत असतात. एखाद्या प्रत्यक्ष विषयाचे प्रतिकूल ज्ञान (वेदना) झाले असतां, त्या विषयापासून पशु परावृत्त होतात, अनुकूल ज्ञान झाले तर त्या विषयाकडे जातात. ह्याच प्रमाणे मनुष्याची स्थिति आहे. काठी उगारून गाईकडे गेले असतां गाय पळून जाते. हिरवा चारा किंवा अबोण हातात घेऊन उभे राहिले तर गाय धांवत आपल्याकडे येते. हाच प्रकार मनुष्यांचा आहे. फायद्याचे गोष्टीकडे ते धांव घेतात. नुकसानाच्या बाबीकडे पहात सुद्धा नाहीत. पशूच्या असल्या व्यवहारांत विवेक नसतो ही गोष्ट अगदी प्रसिद्ध आहे. व्युत्पन्न लोकांचे व्यवहार आणि पशुव्यवहार ह्यांमध्ये तत्काल साम्य