पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. ४ निरूक्त, ५ छन्दः व ६ ज्योतिष अशी ह्या वेदांची सहा अर्ग आहेत. १ पुराणे, २न्याय, ३ मीमांसा आणि ४ धर्मशास्त्रे ह्या चार ग्रन्थांस वेदांची उपांगें म्हणतात. ह्याप्रमाणे ह्या १४ विद्या झाल्या, चौदा विद्या आणि चौसष्ट कला ही मराठी भाषेतील म्हण प्रसिद्ध आहेच. याज्ञवल्क्यांनी आपल्या स्मृतींत असेंच म्हटले आहे. पुराणन्यायमीमांसाधर्मशास्त्रांगमिश्रिताः। वेदाः स्थानानि विद्यानां धर्मस्यच चतुर्दश । — पुराण ' शब्दाने १८ महापुराणे व १८ उपपुराणे ह्यांचा बोध होतो, असे समजावें; ' न्यायांत ' न्यायशास्त्र व वैशेषिक दर्शनाचा अन्तर्भाव होतो, मीमांसेंत वेदान्तदर्शनहि येतें. स्मृति, धर्मशास्त्रे, आणि सांख्य, पातंजल, पाशुपत व वैष्णव ही दर्शनें, आणि महाभारत व रामायण हे इतिहास ह्या सर्वांची गणना धर्मशास्त्रांत होते. याप्रमाणे ४ वेद, त्यांची ६ अंगें, व ४ उपांगें (पुराणे न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्रे) ही मिळून १४ विद्या होतात. याशिवाय आणखी चार उपवेद आहेत. त्यांची नांवें येणेप्रमाणे:--१ आयुवेंद, २ धनुर्वेद, ३ गांधर्ववेद आणि ४ अर्थशास्त्र. पूर्वीच्या १४ विद्या आणि हे चार उपवेद मिळून १८ विद्या मानिल्या आहेत. ह्या अठरा विद्या येऊ लागल्या म्हणजे सांगोपांग वेदाचें अध्ययन होतें. - . वर सांगितलेली सर्व प्रस्थाने अस्तिकमताचे प्रतिपादन व मंडन करणारी आणि विधिनिषेधाचे कथन करणारी आ