पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. अनात्म ( बुद्धि, अहंकार इत्यादि ) वस्तूंचा अध्यास झाला असतां त्यांत विरोध किंवा विसंगतता कांहीं एक असणार नाही. चिदात्म्यावर अनात्म्याचा अध्यास होण्यास काही हरकत नाही. अनात्म्याचा आत्म्यावर हा जो अध्यास असतो त्याला पंडित लोक ' अविद्या ' असे म्हणतात. ह्या आरोपित धर्माचा ( अविद्येचा ) विवेकानें नाश करून वस्तूच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेणे, ते बरोबर ओळखणे, त्या स्वरूपाची प्रतीति-अवधारण-होणे, ह्यालाच 'विद्या' म्हणतात. अध्यस्त वस्तूच्या गुणाने किंवा दोषाने आत्मा संबद्ध होत नाही. आत्मा व अनात्मा ह्यांच्या एकमेकांवर होणान्या अध्यासाला 'अविद्या' असे नाव दिले आहे; याच अविद्येचा आश्रय करून सर्व लौकिक आणि वैदिक प्रमाण व प्रमेय यांचे व्यवहार चालू असतात. त्याचप्रमाणे सर्व शास्त्रे त्या अविद्येवर अवलंबून असतात. कर्माच्या विधि किंवा निषेधाविषयी ही शास्त्रे असोत किंवा मोक्षाविषयीं ती असोत. सर्व शास्त्रे अविद्यामूलक आहेत. प्रत्यक्षादि प्रमाणे आणि शास्त्रे ही अविद्यावद्विषय कशी असतील, अशी शंका घेण्याचे कारण नाही, कारण, देह, इंद्रिय, इत्यादि विषयांवर ममता, व अहंता बसून मी माझं असा अभिमान उत्पन्न झाला नाही, तर मनुष्याला एकाद्या वस्तूविषयी ज्ञान मिळवून घेण्याची इच्छाच होणार नाही. म्हणजे, त्याच्या अंगी प्रमातृल येणार नाही; आणि प्रमातृत्व नसल्यावर प्रमाणांची प्रवृत्तिहि चालू रहाणार नाही. प्रमाता - - -