पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. तांतील अनेक मतवादी लोकांची अध्यासाविषयीं व्याख्या निरनिराळी आहे. तथापि त्या सर्वांमध्ये मुख्य मुद्यासंबंधाने एकवाक्यताच आहे. कोणत्याहि एकाद्या वस्तूच्या धर्माचा आरोप दुसऱ्या वस्तूवर करणे, ही गोष्ट सर्वांस मान्य आहे. म्हणून सामान्यतः अध्यासाचे लक्षण हेच आहे असें मानलें तरी हरकत नाही. आतां एका वस्तूचा अध्यास किंवा आरोप दुसन्या वस्तूवर होतो, ही गोष्ट खरी, परंतु ज्या वस्तूवर अध्यास व्हावयाचा असतो, ती वस्तू आपल्या इंद्रियास गोचर असली पाहिजे. ती आपल्या पुढे असली पाहिजे. नाही तर त्या वस्तूवर आरोप होणार नाही. चिदात्मा हा इंद्रियातीत आहे. कोणत्याहि इंद्रियास तो गोचर नाही, ह्यासाठी त्याच्यावर अध्यास होणे शक्य नाहीं.--अशी शंका घेण्यास कारण नाही. चिदात्मा हा कधीह कोणास गोचर नाही. कोणाचाच तो विषय नसतो, अशी वस्तुस्थिति नाही. चिदात्मा हा अस्मत्प्रत्ययाचा ( मी, मी, ) विषय असतो. आणि तो अपरोक्ष आहे, म्हणजे स्वयंप्रकाश आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव किंवा भान सर्वास असते. ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. शिवाय ज्या वस्तूवर अध्यास होण्याचा असतो ती वस्तु आपल्या पुढे ( इंद्रियगोचर ) असलीच पाहिजे, असा काही नियम नाही. कारण आकाश हे इंद्रियगोचर नसूनहि तें धूसर आहे; स्वच्छ आहे, ( इत्यादि ), असें लोक म्हणत असतात. ह्या कारणावरून चिदात्म्यावर