पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ प्रस्थानभेद. अध्यास होत असतो. एखाद्या दोन गोष्टी घेतल्या असतां, त्यामध्ये वस्तुतः ऐक्य किंवा साम्य नसतांहि, ही एक वस्तू ती आहे, किंवा ती वस्तू ती हीच, असा समज होत असतो. ह्याप्रमाणे सत् व असत् यांस एकमेकांत मिसळून टाकून त्यापासून होणाऱ्या मिथ्याज्ञानावर सर्व नैसर्गिक लौकिकव्यवहार चालू असतात. 'हा मी, माझें,' एका चंद्राचे दोन तीन चंद्र दिसतात.' 'आकाश निळे असतें.' ( इत्यादि ). याप्रमाणे आपण नेहमी बोलत असतो व आपला असाच व्यवहार चालला असतो. 'अध्यास होतो' असे शब्द वर आले आहेत, तर ह्या अध्यास शब्दाचा अर्थ तरी काय ? असें पुष्कळ लोक विचारतात. पूर्वी पाहिलेल्या आणि स्मरणांत असलेल्या एखाद्या वस्तुचा अवमास त्या वस्तूहून निराळ्या असणाऱ्या वस्तूवर होणे, यास अध्यास म्हणतात. अन्तरावर असलेलें झाडाचे खोड हे मनुष्य आहे, असे वाटणे; स्वच्छ शिंप रुप्यासारखी भासणे; चंद्र एकच असतां ते अनेक दिसणे; पाण्यांत गति उत्पन्न करणारा वेग एकच असतो, परंतु त्याच्या अनेक लाटा दिसतात. चित्रपटावर अनेक देखा. व्यांचा ( Perspective ) भास होणे, निरभ्र आकाश निळे दिसणे इत्यादि अध्यासाची उदाहरणे होत. अशा रीतीने सत् व असत्, वस्तु व अवस्तु, किंवा चेतन व अचेतन यांचा एकमेकांवर अध्यास होत असतो. वेदां -