पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. होत गेला असावा. शंकराचार्यानी मायावादाची स्थापना करून त्याच्यायोगानें वेदान्तमतावर येणारे आक्षेप दूर केले आहेत. आचार्यांच्याच मायावादावर पुढले वेदांत ग्रंथ रचले गेले आहेत, आणि आचार्यांच्या मताचे प्राबल्य झाल्यामुळे तेंच मत आतां बहुमान्य झाले आहे. प्रकाश व अंधकार ह्या दोन वस्तू एके ठिकाणी कधीहि असावयाच्या नाहीत. त्याचप्रमाणे मी व तूं हे दोन शब्द एकाच वेळी एका व्यक्तीचा बोध कधींहि करणार नाहीत. अगदी भिन्न अशा दोन व्यक्ति दाखविणारे हे दोन शब्द आहेत. ह्याच कारणास्तव 'दृक् ' व 'दृश्य' किंवा ' विषयी ' आणि ' विषय ' ह्या अगदी भिन्न वस्तू आहेत. ह्यांचा एकमेकांत अभाव असतो. म्हणजे विषयी किंवा त्याचे धर्म, विषयांत व विषयधर्मात असू शकणार नाहीत. किंवा याचे उलट विषय आणि त्याचे धर्म विषयी व विषयोधर्मात असणे अशक्य आहे. यासाठी चिदात्मारूपी जो विषयी त्याचा व त्याच्या धर्माचा अध्यास विषयावर व त्याच्या धर्मावर होणे, किंवा विषयांचा व विषयधर्माचा अध्यास विषयीवर होणें-ह्मणजे विषयी विषय आहे, किंवा विषय, विषयी आहे असा अवभास ( मनाची समजूत ) होणे, ही गोष्ट असंभवनीय आहे, असे स्पष्ट दिसून येईल, हे अगदी साहजिक आहे. असे असूनहि, व्यवहारांत ह्या दोन गोष्टींत ( विषयी व विषय, धर्मी व धर्म ) विवेक न करता आल्यामुळे, एकमेकांवर एकमेकांचा