पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ प्रस्थानभेद. विषयावर शंका, शंकेमुळे त्या विषयाचा पूर्वपक्ष, पूर्वपक्षाचें खंडन करून विषयाविषयी सिद्धान्त स्थापणे, आणि या सर्वांची संगति लावून देणे, या पांच भागांचे एक अधिकरण होते. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापति, शब्द (वेद) आणि अभाव ही सहा प्रमाणे जैमिनींस जशी मान्य आहेत, तशीच ती बादरायणांस मान्य आहेत. पूर्व मीमांसेच्या मताप्रमाणे यांच्या मतेंहि वेद अनादि आहेत व शब्द नित्य आहे. वेद हे जणूं काय ब्रह्मा, निश्वसित (श्वासोच्छ्वास ) आहेत अशा दृष्टीने वेदान्ती वेदांचे नित्यत्व मानतात. वेदान्तासारख्या गहन विषयाची म्हणण्यासारखी माहिती येथे करून देणे अगदी अशक्य आहे. तथापि स्थलमानाने तरी त्या विषयाची दिशा कळावी, म्हणून चतु:सूत्रीचा ( पहिल्या अध्यायाचे पहिल्या पादांतील पहिल्या चार सूत्रांचा ) सारांश येथे दिला आहे. यावरून त्या विषयाबद्दल थोडीशी तरी कल्पना करता येईल. आरण्यकें व उपनिषदें त्यांवर बादरायणाचार्यांची ब्रह्मसूत्रे आणि ह्या सूत्रांवर शंकराचार्यांचे भाष्य, ही जी वेदान्त मताची तीन स्वरूपं, त्यांत त्या मतासंबंधाने सर्वतोपरी अबाधित अशी परंपरा चालत आली आहे, आणि वेदान्तमतांचे मंडण एकाच पद्धतीने झाले आहे असें ह्मणतां येणार नाही. कारण वेळोवेळी ह्या मतावर जे आक्षेप आले, त्यांचे निरसन करण्यास निरनिराळे युक्तिवाद उपस्थित होऊन त्या वादांत वेदान्तमताचा विकास अधिक अधिक