पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमामांसा. बोध्यायनाचे भाष्य आहे. हा ग्रन्थ सध्या उपलब्ध नाही. रामानुजांचें भाप्य ह्या बोध्यायन ग्रन्थाला धरून केलेलें आहे, अशी समजूत आहे. ब्रह्मसूत्रांवर सध्या चार मोठी सुप्रसिद्ध भाप्ये आहेत. मध्व, रामानुज, वल्लभ आणि शार या विख्यात आचार्यानी ही चार भाप्ये आपापल्या मतांप्रमाणे केली आहेत. शंकराचार्याचे भाप्य त्यांच्या युक्तिवादाच्या कौशल्यामुळे, व मायावादाच्या योगाने सर्व भाप्यांचा मेरुमणि असें मानिले जाते. आचार्याच्या पुढे जे कांहीं अद्वैत वेदान्तावर ग्रन्थ झाले, त्या सर्वांची भिस्त मायावादावरच आहे. वेदान्तपरिभाषा, वेदान्तसार, योगबाशिष्ठ, पंचदशी, संक्षेपशारीरिक, शास्त्रदीपिका इत्यादि अनेक लहान मोठे ग्रन्थ वेदान्तावर झालेले आहेत. हे केवळ आचार्यांच्या मताचे आहेत. दुस-या भाप्यकारांचे मतानुयायी असेहि अनेक ग्रन्थ आहेत. ते असेच महत्त्वाचे आहेत. त्या मतांचे सार येथे देता येत नाही. केवल अद्वैतमताचाच सारांश पुढे दिला आहे. उत्तरभामांसेंतील मुख्य विषय ' ब्रह्म काय आहे ' हा आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या पादाचे पहिल्या सूत्रांतव हा विषय सांगितला आहे. " अथातो ब्रह्मजिज्ञासा ब्रह्मविषयक ज्ञान करून घेण्याची इच्छा. ब्रह्म म्हणजे काय हेच त्यांतील पहिले व मुख्य अधिकरण होय. अधिकरण शब्दांचा अर्थ पूर्वमीमांसेंत सांगितला आहे. कोणत्याहि एका विषयांचे पूर्ण प्रतिपादनास अधिकरण म्हणतात. विषय,