पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० प्रस्थानभेद. ( सू. ५२. अ. १७ ). या अध्यायांत एकंदर सूत्रं १८६ आहेत, आणि अधिकरणे ६७ आहेत. ४ चवथा फलाध्याय-यांत सगुण व निर्गुण विद्येच्या विशेष फलांचा निर्णय केला आहे. पहिल्या पादांत श्रवण, मनन, इत्यादि साधनांच्या अभ्यासाने ब्रह्मसाक्षात्कार झाल्यावर जिवंत असणाऱ्या मनुष्यास पाप, पुण्य, क्लेश इत्यादिकांचा लेप होत नाही, आणि तो मनुप्य जीवन्मुक्त होतो, असे सांगितले आहे. जीवन्मुक्ति येथे सांगितली आहे. ( सू. १८. अ. १४ ). दुस-या पादांत, मेल्यावर उत्क्रमण किंवा उत्क्रान्ति कशी होते याचा प्रकार वर्णिला आहे. ( सू. २१. अ. ११). तिसऱ्या पादांत, सगुण ब्रह्माचें ज्ञान झालेला पुरुष किंवा त्याचा उपासक, हा मेल्यावर त्याचा उत्तर मार्ग कोणता व कसा असतो, हे सांगितले आहे. ( सू. १६. अ. ३ ). चवथ्या पादाच्या पूर्व भागांत निर्गुण ब्रह्मज्ञान झालेल्या मनुष्यास विदेहकैवल्याची प्राप्ति होते, असे सांगितले आहे. उत्तर भागांत सगुणब्रह्मोपासकांना ब्रह्मलोकांत स्थान मिळते, असें सांगितले आहे. ( स. २२. अ. ७). या अध्यायांत एकंदर सूत्रे ७७ आणि अधिकरणे ३८ आहेत. ब्रह्मसूत्रं हा ग्रन्थ गुरुमुखावांचून किंवा टीकांचे साहाय्य न घेतां समजण्यास फार बिकट आहे. किंबहुना त्यांचा अर्थ समजणे शक्यच नाही. ह्या ग्रन्थावर फार जुनें असें