पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. १२९ मुमुक्षूच्या जीवाच्या अनेक अवस्था, ब्रह्मस्वरूपा (तत्त्वमसि) चा विचार, पराऽपरा विद्या, विद्येचे भेदाभेद, गुणांचा उपसंहार व अनुपसंहार, सम्यग्दर्शनापासून पुरुषार्थाची सिद्धि होते, सम्यग्दर्शन प्राप्त होण्याचे उपायविधि, त्यांचे भेद, मुक्तिफलाचे नियम इत्यादि विषयांचा विचार व प्रसंगोपात्त दुसरे काही आलेल्या विषयांचा ह्या अध्यायांत विचार केला आहे. पहिल्या पादांत जीवाचें परलोकांत गमनागमन सांगून वैराग्याचे प्रतिपादन केले आहे. ( सू. २७ अ.६). दुसन्या पादांतील पूर्वार्धात ' तत्त्वमसि' या श्रुतिवाक्यांतील ' त्वम् ' ह्या पदाच्या अर्थाचा विचार करून तो स्थापित केला आहे. उत्तरार्धात 'तत् ' ह्या शब्दाच्या अर्थाचें संशोधन केले आहे. ब्रह्म काय आहे, ही गोष्ट समजून घ्यावयाची असते, ह्मणजे ब्रह्म हे विज्ञेयवस्तु आहे. या विज्ञेयब्रह्माच्या तत्त्वाची व्याख्या या पादांत केली आहे. (सू. ४ १. अ. ८). तिसऱ्या पादांत, अनेक वेदशाखांमध्ये निर्गुण ब्रह्मासंबंधी आलेल्या पुनरुक्तपदांचा गुणोपसंहार केला आहे, आणि प्रसंगानुरोधाने सगुण व निर्गुण विद्येच्या संबंधी अनेक शाखांत आलेल्या गुणोपसंहार व गुणाननुपसंहार यांचे निरूपण केलेले आहे. आहे. ( सू. ६६. अ. ३६). चवथ्या पादांत, निर्गुण ब्रह्मविद्येची बहिरंगसाधनें व अन्तरंगसाधने यांचे निरूपण आहे. आश्रमधर्म, यज्ञादिकर्मे, हीं बहिरंगसाधनें होत. शम, दम, निदिध्यासन इत्यादि अन्तरंगसाधने आहेत.