पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ प्रस्थानभेद. आहेत ते दाखवून त्या पक्षांचे खण्डन केले पाहिजे, म्हणजे आपल्या मतांस दृढता येते. ( सूत्रे ४५ , आधिकरणे ८). तिसऱ्या पादाच्या पूर्वार्धात पंचमहाभूतादिकांच्या सृष्टांसंबंधाने जी श्रुतिवाक्ये आहेत, त्यामधों दिसून येणान्या परस्परविरोधाचे निरसन केले आहे. जीवात्म्याविषयीं श्रुतिवाक्यांतील परस्परविरोध याच पादाच्या उत्तरार्धात काढन टाकला आहे. ( सूत्रं ५३. अ. १७). चवथ्या पादांत लिंगशरीर किंवा इंद्रियें यांच्या संबंधी श्रुतिवाक्यामध्ये असणाऱ्या परस्परविरोधाचा परिहार केला आहे. ( सूत्रं. २२. अ. ९ ) याप्रमाणे ह्या अध्यायांत स्मृति, सांख्य, योग, कणादमत, न्याय इत्यादिमतांकडून येणाऱ्या विरोधाचा परिहार केला आहे, आणि ह्या परपक्षांची वेदान्त विषयांस अपेक्षा नाहीं, असे सिद्ध केले आहे. तसेंच श्रुतिवाक्यांतील विप्रतिषेध म्हणजे परस्परविरोध जो दिसून येतो, तो वस्तुतः नाही, असे सिद्ध करून दाखविले आहे. जीवाहून व्यतिरिक्त असणारी तत्वे, जी जीवाची उपकरणे होतात, ती सर्व ब्रह्मापासूनच उत्पन्न झाली आहेत, असेंहि या अध्यायांत सांगितले आहे. ह्या अध्यायांत एकंदर १५७ सूत्रं आणि ४७ अधिकरणे आहेत. ३ तिसरा साधनाध्याय-या अध्यायांत ब्रह्मविद्येच्या साधनांविषयी सामान्यतः विचार केलेला आहे. उपकरणे असलेल्या जीवाची संसारांत गति कशी होते, तिचे प्रकार,