पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरमीमांसा. १२७ वाक्यांचा विचार करून चवथ्या पादांत मुख्य विषयासंबंन्धी अव्यक्ता, अजा, इत्यादि जी संदिग्ध पदे आहेत, त्यांचा विचार केला आहे. पहिल्या अध्यायांत एकंदर १३४ सूत्रं व ३९ अधिकरणे आहेत. ह्या अध्यायांत सर्वज्ञ सर्वेश्वर हा जगताचे उत्पत्तिकारण आहे, असे प्रतिपादन केले आहे. मृत्तिका,सुवर्ण इत्यादि जशी घट, अलंकार इत्यादिकांची उत्पत्तिकारणे असतात,त्याच प्रमाणे सर्वेश्वर जगाचें उत्पत्तिकारण आहे. ह्या जगाचा तो नियंता असल्यामुळे त्याचे स्थितिकारणहि तोच आहे. योनिज अण्डज इत्यादि चार प्रकारच्या सृष्टीचा उपसंहार किंवा लय जसा पृथ्वीत होतो त्याच प्रमाणे सर्व जगताचा लय ईश्वरांत होतो. तोच आपल्या सर्वांच्या शरीरांतील आत्मा होय. ह्या उपनिषदवाक्यांचा ( वेदान्ताचा ) समन्वय पहिल्या अध्यायांत लाविला आहे आणि अद्वितीय ब्रह्म सिद्ध केले आहे. २ अविरोधाध्याय असें दुसऱ्या अध्यायाचें नांव आहे. या अध्यायांत स्मृति व न्याय इत्यादिकांकडून येणाऱ्या (वेदान्तमतांस ) विरोधाचा परिहार केला आहे. या अध्यायाचे पहिल्या पादांत सांख्य, योग, कणादमत, इत्यादिकांनी वेदान्तवाक्यांवर आणलेल्या विरोधाचा परिहार केला आहे. विलक्षणत्वादि सर्व दोष काढून टाकिले आहेत. ( सूत्रे ३७ अधिकरणे १३). दुसन्या पादांत सांख्यादिमतांत दोष आहेत ते दाखविले आहेत, कारण, स्वपक्षाचे मंडन करून स्थापना करणें, येवढेच पुरे होत नाही, परपक्षांत दोष कोणते