पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद, आपल्या हिंदुलोकांच्या सर्व धार्मिक व तात्त्विक किंवा शास्त्रीय ग्रंथांत ईश्वरप्राप्ति, मोक्ष, परागति, अतिश्रेयस्कर वस्तु किंवा ब्रह्मज्ञान, ही प्राप्त करून घेण्यास मार्ग कोणते ? आपण कोण ? जग हे काय आहे ? आपलें आचरण ह्या जगांत कसे असावें ? आपण काय केले पाहिजे ? वगैरे गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने सांगितल्या आहेत. अनेक काळी आणि निरनिराळ्या परिस्थितीत तत्त्वज्ञानी लोकांनी ह्या गोष्टींचा विचार केला आहे, आणि त्यांच्या विचारसरणीस जो जो मार्ग श्रेयस्कर असा वाटला त्या त्या मार्गाचे अवलंबन करावे, असे त्यांनी प्रतिपादन केलें आहे. ह्या अनेक मार्गास प्रस्थान असे म्हणतात, ह्या प्रस्थानांचे कोणकोणते भेद आहेत, हे सांगून व त्यांचे स्वरूप त्रोटकरीतीने वर्णन करून पूर्वांच्या मान्य व धर्मास आधारभूत झालेल्या ग्रन्थाविषयी काहीनाकाहीतरी खरी कल्पना सामान्य वाचकाचे मनांत यावी, या हेतूनं हा अल्प प्रयत्न केला आहे. आपल्या सर्व तात्त्विक व धार्मिक ग्रन्थांस वेद हे प्रमाणभूत आहेत, हे येथे सांगावयास नको. • १ ऋग्वेद, २ यजुर्वेद, ३ सामवेद आणि ४ अथर्ववेद असे चार वेद आहेत. १ शिक्षा, २ कल्प, ३ व्याकरण,