पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. अध्यायांत चार चार पाद आहेत. प्रत्येक पादांत सूत्रे व अधिकरणे असतात. या ग्रन्थांत एकंदर ५५५ सूत्रे व १९२ अधिकरणे आहेत. अधिकरणांची संख्या अद्वैतमतास अनुसरून दिली आहे. विशिष्टाद्वैत द्वैत इत्यादि मतांप्रमाणे अधिकरणांत कमीजास्ती सूत्रं येतात, त्यामुळे अधिकरणांची संख्या कमीजास्त होते. उदाहरणार्थ पहिल्या अध्यायाच्या पहिल्या पादांतील दुसरें व तिसरे सूत्र ( जन्माद्यस्य यतः ॥२॥ शास्त्रयोनित्वात् ॥ ३ ॥) या प्रत्येकाचेच एक एक अधिकरण आहे, असें अद्वैतमतवादी समजतात. परंतु वल्लभाचार्यांच्या मताप्रमाणे, ही दोन्ही सूत्रे मिळून एकाच अधि करणाची व्यवस्था लावतां येते. तसेच ह्याच पादांतील अद्वैत. मताप्रमाणे दहाव्या अधिकरणास २४-२७ सूत्रांची जरूरी आहे. मध्वाचार्य एकट्या २४ व्या सूत्रावरच आपलें एक अधिकरण स्थापित करतात. (१) पहिला समन्वय अध्याय; यांत सर्व वेदान्तवाक्यांचा तात्पर्यार्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने, प्रत्यगभिन्न, अद्वितीय असें जें ब्रह्म त्याजकडेसच जातो, असे प्रतिपादिलें आहे. म्हणून या अध्यायास समन्वय अध्याय असें म्हणतात. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या पादांत स्पष्ट ब्रह्मलिंग अशी जी वाक्ये आहेत त्यांचा विचार केला आहे. दुसऱ्या पादांत अस्पष्टलिंग, उपास्यब्रह्म या विषयींच्या वाक्यांची मीमांसा आहे. तिसऱ्या पादांत अस्पष्टलिंग ज्ञेयब्रह्म संबंधी वौक्यांचा विचार केला आहे. याप्रमाणे पहिल्या तीन पादांत सर्व