पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२५ उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा. - - - - - - - धर्म, अर्थ, काम, व मोक्ष, ह्या चार पुरुषार्थीची प्राप्ति होण्यास वेदाच्या अर्थाचे ज्ञान होणे अगदी अवश्य आहे कर्म, उपासना आणि ज्ञान ही पुरुषार्थप्राप्तीची साधने होत. पूर्वमीमांसेंत वैदिक कर्मासंबन्धाने विचार केला आहे. उत्तरमीमासेंत केवळ ज्ञानमार्गाचे प्रतिपादन केले आहे. जीव व शिव ( म्हणजे ब्रह्म ) ह्यांत ऐक्य आहे. ह्या दोन निराळ्या वस्तू नाहीत. दोन्ही एकच, अशी मनाची पक्की खात्री होणे व ही प्रतीति मनांत बरोबर बिंबून रहाणे, यास ज्ञान म्हणतात. असल्या ज्ञानाचा विचार उत्तरमीमांसेंत केला आहे, म्हणून ह्या मीमांसेस शारीर ( ब्रह्म ) मीमांसा किंवा ब्रह्ममीमांसा असेंहि म्हणतात. यांतील सूत्रांचा कर्ता व्यासमुनि आहेत, म्हणून वैयासिकी मीमांसा असेंहि उत्तरमीमांसेचे नांव आहे. उपनिषदें ही वेदांच्या शेवटच्या भागांत अन्ती सांगितली आहेत,म्हणजे ती वेदांचा अन्त आहेत, म्हणून त्यांस वेदान्त म्हणतात. उपनिषदांच्या आधारावरून हा ग्रंथ लिहिला असल्यामुळे, आणि त्यांत उपनिषदांच्या तत्त्वार्थाचें प्रतिपादन असल्यामुळे, ह्या ग्रन्थास वेदान्तमीमांसा असें कोणी म्हणतात. हा ग्रन्थ सूत्रात्मक आहे. ही सूत्रं बादरायणांनी केली आहेत म्हणून त्यांस बादरायणसूत्रं असें नांव आहे. वेदान्तसूत्रे, किंवा ब्रह्मसूत्रे या नांवानीहि त्याची प्रसिद्ध आहे. उत्तरमीमांसेचे चार अध्याय आहेत. प्रत्येक