पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ प्रस्थान द. याप्रमाणे वैदिक विषयांच्या शास्त्रार्थीचा विचार जैमि- . नीनी ९०७ ( ९१५१ ) अधिकरणांत केला आहे. पूर्वमीमांसेत एकंदर सूत्रसंख्या २७४५ आहे, हे पूर्वी सांगितले आहे. जैमिनीप्रमाणे दुसऱ्या ऋषींनी असल्या विषयांची मीमांसा केली असावी. म्हणजे त्यांनी असली विचारशास्त्रे लिहिली असावीत, कारण जैमिनीचे मीमांसाग्रन्थांत त्याचा उल्लेख येतो. पूर्वमीमांसा शास्त्रावर ' उपवर्षांनी ' वृत्ति केली आहे. हे उपवर्षाचार्य नन्दाचे राज्य चालू असतां होते. शबरभ्वामींचे मीमांसेवर मोठे भाष्य आहे. हर्षवर्धन राजाच्या लिंगानुशासन ग्रन्थावर व्याख्या लिहिणारे, भट्टदीप्ताचे पुत्र शबरस्वामी व मीमांसाभाष्य करणारे शबरस्वामी, हे दोघे एकच किंवा कसे, हे मात्र निश्चयाने सांगतां येत. नाही. कुमारिल भट्टाचार्यानी याच ग्रंथावर बार्तिक लिहिले आहे. कुमारिलभट्ट शंकराचार्यांचे समकालीन होत, ह्या वार्तिकाला अनुसरून पार्थसारथिमिश्रानी शास्त्रदीपिका नांवाचा ग्रन्थ प्रसिद्ध केला आहे. याप्रमाणे वेळोवेळी अनेक ग्रन्थ पूर्वमीमांसा ग्रन्थावर झालेले आहेत. ह्या दर्शनाचा सारांश सर्वांस सहज समजावा म्हणून माधवाचार्यानी सोप्या भाषेत आणि थोडक्यांत असा · जैमिनीन्यायमाला ' या नांवाचा ग्रन्थ लिहिला आहे. यास मीमांसाधिकरणमाला असेंहि नांव आहे. माधवाचार्य हे बुक्क राजाचे मंत्री होते (इ. स. १३७५----पुढे ).