पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा. १२३ किंवा आगमा ( वेदा ) वरून? अनुमानाने वेदाचे पौरुषेयत्व सिद्ध होते, असें जर म्हटले तर त्या अनुमानांत व्यभिचरित हेतु होईल, म्हणजे खोटें अनुमान ठरेल. कारण असल्या अनुमानानें मालतीमाधवासारख्या काल्पनिक ग्रन्थास सुद्धा वेदाची योग्यता येईल. शिवाय दुसऱ्या कोणत्याहि प्रमाणांनी जी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा आपल्यास कळून येत नाहीं ती गोष्ट वेदावरून कळते, हे मत सर्वांस मान्य आहे. असे असून दुसऱ्या प्रमाणावरून सिद्ध झालेली वस्तू आपणास वेद सिद्ध करून देतात, असें म्हणण्यांत व्याघात उत्पन्न होतो. माझी आई वांझ आहे असे म्हणण्यासारखेच हे म्हणणे आहे. परमेश्वराने आपल्या लीलेनें देह धारण करून वेद उत्पन्न केले असे म्हटले तर, देहाबरोबर त्याचे सर्व उपाधि येतात आणि इंद्रिये आपापलींच कामें करतील. म्हणून ईश्वराच्या शरीरांतील इंद्रियांना आपापल्या कार्याशिवाय दुसऱ्या इंद्रियांचे कार्य करता येईल असे कधीं होणार नाही, किंवा त्याला अतीन्द्रियज्ञान होईल असेंहि होणार नाही. म्हणून ईश्वर वेदांचा कर्ता असे होणार नाही. पाणिनीच्या 'तेनोक्तम् ' ( ४-३-१०१ ) या सूत्राप्रमाणे काठ, कापल, तैत्तिरीय या शब्दांचा अर्थ काठ कपल, तित्तिर यांनी केलेले ग्रन्थ असा करूं नये, परंतु त्यांनी त्या त्या विषयांची व्यवस्था लावली असा अर्थ होतो; याचप्रमाणे पुरुषसूक्तांतील 'ऋचः सामानि ' या मंत्राची व्यवस्था लावली पाहिजे. म्हणून आगमावरून सुद्धा वेद पौरुषेय आहेत असे सिद्ध होत नाही. हा सिद्धान्त,