पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ मस्थानभेद. की भारताची अशी परंपरा असली तरी भारतग्रंथ व्यासानी रचला आहे, असें म्मृतिवाक्य आहे म्हणून भारतग्रन्थ हा पौरुषेय आहे. यांस नैयायिकांचे उत्तर असें आहे. स्मृतीच्या आधारानं जर भारताचे पौरुषेयत्व सिद्ध होते, तर वेदाच्याच आधाराने ते ईश्वरप्रणीत आहेत; म्हणजे पौरुषेय आहेत असे सिद्ध होईल. पुरुषसूक्तांत ( मं. १०-१-९०) ऋच: सामानि जज्ञिरे, ह्या मंत्रांत ईश्वरापासून वेद निघाले असं अगदी स्पष्ट सांगितले आहे. यावर सिद्धान्तवादी मीमांसाकार नैयायिकास विचारतात. वेदांचे पौरुषेयत्व सिद्ध करण्याची तुमची इच्छा आहे, असें हैं पौरुषेयत्व कोणते ? आपण दररोज वेद म्हणतो, त्याचे उच्चारण करतो, ह्या उच्चारणासंबंधाने वेदांचे पौरुषेयत्व तुमच्या मनांत सिद्ध करावयाचे, किंवा ( २ ) दुसऱ्या अनेक प्रमाणांनी समजलेला अर्थ आपण जसा ग्रंथांत रचून प्रसिद्ध करतो, त्याच प्रमाणे वेद हे असंच ग्रथित आहेत, म्हणून त्यास पौरुषेयत्व आहे ! आपण नेहमी वेदाचे उच्चारण करतो तें पौरुपेय आहे, असे जर नैयायिकादि पौरुषेयत्ववादी लोकांचे म्हणणे असेल, तर त्यांच्या व आमच्या मतांत विरोध नाहींच, कारण त्या दृष्टीने पाहिले असतां वेद हे पौरुषेय आहेत, असे आम्हीहि कबूल करतो. २ त्यांच्या मते वेद हे प्रमाणान्तराने सिद्ध झालेल्या अर्थाचे प्रतिपादन करणारे असे ग्रंथ आहेत, असे जर त्यांचे म्हणणे असेल, तर कोणत्या प्रमाणाच्या आधाराने वेदांचें पौरुषेयत्व सिद्ध होतें अनुमानाने