पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा. अर्थ नाही, असे म्हणण्यास काही कारण नाही. जो अर्थ आपल्यास समजतो तोच खरा अर्थ, असे समजले पाहिजे. वेदाच्या ह्या विवक्षित अर्थाविषयी एखाद्याला एखाद्या वेळी कदाचित् शंका आली ( आणि अशी शंका येणे स्वाभाविक आहे.) तर त्या शंकेचे निराकरण विचारशास्त्राकडूनच करून घेतले पाहिजे. म्हणून विचारशास्त्र शिकणे अवश्य आहे. हा सिधान्त. ___ पूर्वमीमांसा हा ग्रन्थ एक मोठे विचारशास्त्र आहे. ह्याचें अध्ययन करणे सर्वस्वी अवश्य आहे. हे या पहिल्या अधिकरणांत सिद्ध केले आहे. सर्व अधिकरणांत विषयांचें प्रतिपादन करण्याची पद्धति याचप्रमाणे असते. वेद पौरुषय आहेत किंवा अपौरुषेय आहेत, या विषयाची चर्चा फार वेळ होत असते; भीमांसाकारांनी वेदाचें अपौरुषेयत्व सिद्ध करण्यांत कसा बुद्धिवाद केला आहे, ह्याविषयी थोडीशी माहिती असावी म्हणून त्या अधिकरणाचा सारांश पुढे दिला आहे. वेदाचें अपौरुषेयत्व हा या अधिकरणाचा विषय होय. वेद कोणी तरी ( एकाद्या पुरुषाने ) रचले व सांगितले ! किंवा कोणीहि ते रचिले नाहीत, ते स्वयंसिद्ध आहेत ( अपौरुषेय आहेत !) ही शंका. नैयायिकांच्या मते वेद हे पौरुषेय आहेत. भीमांसाकार वेद अपौरुषेय आहेत असे मानतात. नैयायिकांचा पूर्वपक्ष आहे. ते म्हणतातः(१) काय हो! काही एक प्रमाण नसून तुम्ही वेद अपौरुषेय आहेत, असे कसे म्हणतां ! अविच्छिन्न असा