पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१२० . प्रस्थानभेद संप्रदाय चालत आल्यामुळे ' आत्म्याचा ' आदिकर्ता कोण ह्याची जशी आपल्यास स्मृति राहिली नाही, त्याप्रमाणेच वेदाचा कर्ता कोण, हे आपल्यास स्मरत नाही, असें जर तुम्ही ( मीमांसाकार ) म्हणत असाल, तर ते म्हणणे यथार्थ नाहीं; कारण प्रलयकालीं वेदांच्या संप्रदायाचा विच्छेद होत असतो, असे आमचे ( नैयायिकांचें ) मत आहे म्हणून वेदाविषयीं अविच्छिन्न संप्रदाय नाही. ( २) वेदाच्या कर्त्याविषयी आम्हास स्मरण नाहीं असें तुम्ही म्हणतां, याचा अर्थ काय ? वेदाचा कर्ता आहे अशी तुमची समजूत होत नाहीं ( वाटत नाही.) किंवा त्यांचा कोण कर्ता हे कोणाला आठवत नाहीं (ठाऊक नाही)! पहिली गोष्ट अशक्य आहे. कारण ईश्वर हा वेदांचा कर्ता आहे, हे प्रमाणाने सिद्ध होत आहे. दुसरी गोष्ट वेदांचा कर्ता आठवत नाही. बरें! ही आठवण काहीजणांस नाही ? कां कोणा एकास सुद्धां सर्वांस ) नाही ? काही लोकांस आठवत नाही किंवा माहीत नाही, असे जर तुम्ही ( मीमांसाकार ) म्हणत असाल, तर तुमच्या मताप्रमाणे वेदांचेच काय, पण दुसऱ्या अनेक ग्रन्थांसंबन्धानें अपौरुषेयत्व स्थापित होईल. उदाहरणार्थ “ यो धर्मशीलो जितमानरोषः इत्यादि " ह्या चरणाचा कर्ता कोण, हे पुष्कळांना ठाऊक नसेल. म्हणून हा ग्रन्थहि अपौरुषेय होईल. आंता, कोणा एकालासुद्धा वेदाचा कर्ता माहीत नाही असे म्हटलें, तर हे म्हणणे मोठ्या धाडसाचे ठरेल! कारण सर्व लेकांची मनें, त्यांची मतें