पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. पण त्याच्या बरोबर वेदाचा अर्थ समजून द्यावा किंवा शि प्याने तो समजून घेतलाच पाहिजे असे विधिवाक्य नाही, ही गोष्ट आम्हांस कबूल आहे. परंतु शिष्याने सर्व वेद पाठ करून त्या वेदांच्या अंगांचेंहि अध्ययन त्याने केले म्हणजे सामान्य ग्रन्थांचा जसा अर्थ समजतो त्याप्रमाणे शिक्षा व्याकरण निरुक्त ह्यांच्या साहाय्याने त्याला वेदांचा अर्थ समजू लागेल. यावर पूर्वपक्षकार अशी शंका घेतील की हा अर्थ समजतो तो केवळ शब्दांच्या मुख्यार्थावरून समजतो, तो वास्तविक अर्थ आहे असे होणार नाही. उदाहणार्थ 'विष खा" असें आई मुलास एकदां म्हणाली ह्या वाक्याचा मुख्य उत्तान अर्थ जो आहे, तो कांहीं आईच्या मनांतील वास्तविक अर्थ नाही. अमक्याचे घरी जेवण्यास जाऊं नकोस असा तिच्या मनांतील हेतु होता. तसेंच वेदाचा विवक्षित अर्थ कांहीं निराळाच असला तर केवळ शब्दार्थ समजण्यांत कांहीं एक अर्थ नाही. उलट नुकसानच होईल.वेदाचा बरोबर अर्थ समजणार नाही. आणि वास्तविक अर्थ न समजल्यामुळे, विचारशास्त्र व ते शिकण्याचे प्रयोजन ह्यांची अवश्यकता रहाणारच नाही. यावर सिद्धान्तवादी असे प्रतिपादन करतात की हा दृष्टान्त आणि दार्टान्त यांत सादृश्य कांहीं एक नाही. आईसारखी मुलाची आप्त आपल्या मुलास विष खा असें म्हणते. तेव्हा तिच्या मनातील विवक्षित अर्थ विष खाण्याहून कांही निराळाच असला पाहिजे हे स्पष्ट होते. त्याप्रमाणे अपौरुषेय जे वेद त्यांचा मुख्य अर्थ तोच विवक्षित